Success Story : कष्ट करण्याची इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी यामुळे माणूस शून्यातून दुनिया उभी करू शकतो.आयुष्यात आलेली कुठली एक संधी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते हे सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं वावरत असतात जे केवळ मेहनतीच्या जोरावर यश मिळवू शकले आहेत. भले क्षेत्र कुठलं हि का असेना कष्टा शिवाय कोणीही सफल झालेला नाही. आज आम्ही दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहोत जे चटणी विकून करोडो रुपये कमावत आहेत. येव्हडच नव्हे तर आज त्यांचा व्यवसाय इंग्लंड, अमेरिका, जर्मनी यांसारख्या अनेक देशांमध्ये पोहोचलेला आहे.
कशी केली चटणी विकून कमाई? Success Story
हि गोष्ट आहे प्रसन्ना नटराजन आणि त्यांचा मित्र श्रेयस राघव यांची. या दोन्ही मित्रांनी मिळून चटणीफाय( Chutneyfy) या व्यवसायाची सुरुवात केली आहे . चटणी हा खास करून दक्षिण भारतातला खास पदार्थ आहे, आपल्याकडे सुद्धा काही विशिष्ठ पदार्थांची चव वाढवण्यासाठी चटणीचा वापर केला जातो. आता केवळ ५ मिनिटात तयार होणारी हि चटणी एवढी कमाई करवून देईल का? हो नक्कीच का नाही देणार. आपल्यासमोर या दोघांनी तसं उदाहरण ठेवलं गेलं आहे. प्रसन्ना आणि श्रेयस हे बालपणीचे मित्र आहेत. लहानपणी आईला मदत करताना दोघांचा संबंध या पदार्थाशी आला आणि इथूनच त्यांनी वेगवेगळे बदल करवत चटणी बनवण्याचे प्रयत्न सुरु केले. वर्ष 2020 मध्ये त्यांनी चटणीफायची (Success Story) व्यवसाय म्हणू सुरुवात केली.
चटणीफाय आता बनलीये हायफाय:
चटणीफाय हि चटण्या बनवण्याची कंपनी आहे. हातात आलेल्या पॅकेटमध्ये थोडं पाणी मिसळून तुम्ही या चटण्या तयार करू शकता. सध्या या चटणीची चर्चा विदेशात पसरलेली आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसारख्या देशांमधून या पदार्थाला मोठी मागणी आहे. दिवसेंदिवस या पदार्थाची मागणी वाढत चालली आहे. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि चटणी विकून या दोन्ही मित्रांनी 50 लाख ते 6 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली आहे, व अजूनही करत आहेत.
विचार केला तर कंपनीची सुरुवात काही फार जुनी नाही, केवळ तीन वर्षआधी सुरु झालेल्या या कंपनीचं नाव अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे. काही काळातच या कंपनीने आपली स्थिती बाजारात मजबूत केली आहे. हळू हळू हे दोन्ही मित्र अजून नाव कमावतील यात शंका नाही, चटणी विकून पैसा कामाला जाऊ शकतो यावर विश्वास न बसणाऱ्या गोष्टीला चुकीचं ठरवत या दोन मित्रांनी चटणीच्या व्यवसायातून करोडो रुपयांची कमाई केली आहे.