बिझनेसनामा ऑनलाईन । प्रत्येक यशस्वी (Success Story) पुरुषामागे कोणती ना कोणती कहानी नक्कीच असते.आयुष्य यशस्वी होणारी माणसं खूप कष्टाने आणि मेहनतीने वर आलेली असतात. तर बऱ्याच वेळेस आपण घेतलेला एक निर्णय आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकत असतो. त्यामुळे आयुष्यातील निर्णय घेण्यासाठी प्रत्येक वेळेस विचार करणे आवश्यक आहे. बरेच जण प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करत असतात. त्याचा फायदा बऱ्याचदा होतो. तर कधी निराश व्हावे लागते. परंतु निराश न होता पुढे चालत गेलं तर यश नक्कीच मिळतं हे म्हणणं काही चुकीचं नाही. हे वाक्य खरं केलं आहे ते या व्यक्तीने . या व्यक्तीकडे पूर्वी स्वतःसाठी सायकल घेण्यासाठी पैसे नव्हते परंतु एका ठिकाणी प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे आता ते करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
या करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक म्हणजेच महा सिमेंट आणि माई होम कंट्रक्शन कंपनीचे जुपल्ली रामेश्वर राव. यांचे पूर्वी छोटं होमिओपॅथिक क्लिनिक होतं. त्यानंतर त्यांचे आयुष्य एवढ्या मोठ्या पद्धतीने बदललं की आता ते 11,400 करोड रुपयांचे मालक आहेत. एवढेच नाही तर या संपत्तीसह त्यांनी आता स्वतःचा बिजनेस उभा केला आहे. आज आपण त्यांची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत.
सुरुवातीचे आयुष्य –
रामेश्वर राव यांचा जन्म महबूबनगर या ठिकाणचा आहे. सर्वसाधारण परिवारातून आलेले जुपल्ली रामेश्वर राव यांना शाळेत जाण्यासाठी बरेच किलोमीटर पायी जावं लागत होतं. त्यावेळी त्यांच्या वडिलांकडे त्यांना सायकल घेऊन देण्यासाठी पैसे नव्हते. तरीही त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आणि पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला गेलेत. आणि हैदराबादला जाऊन त्यांनी होमिओपॅथिकमधून डिग्री मिळवली. डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी दिलसुख नगर मध्ये होमिओपॅथिक क्लिनिक सुरू केलं. त्यांचं क्लिनिक खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगलं सुरू होतं. तरीही रामेश्वर राव हे असंतृष्ट होते. त्यामुळे त्यांनी रिस्क घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्येसोबतच वाढते जमिनीची, घरांची मागणी आणि रियल इस्टेट उद्योगाला प्रचंड मागणी होती.
सर्वप्रथम 50,000 रुपयांची गुंतवणूक –
रामेश्वर राव यांना प्रॉपर्टी मार्केटची बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळे त्यांनी एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये गुंतवले. आणि त्यांना त्यावेळी तीन पट टक्के रिटर्न मिळाला. त्यानंतर रामेश्वर राव यांनी क्लिनिक बंद करून स्वतःचा रियल इस्टेट व्यवसाय सुरू केला. 1981 मध्ये रामेश्वर राव यांनी होम कंट्रक्शन नावाने एक रियल इस्टेट कंपनीची स्थापना केली.
11400 करोड रुपयांचे मालक – (Success Story)
जुपल्ली रामेश्वर राव यांचा हा बिजनेस बाजारात अत्यंत लोकप्रिय ठरला. यासोबतच त्यांनी सिमेंट व्यवसायातही पाऊल ठेवले आणि आणि आता त्यांची सिमेंट कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास 4000 करोड रुपये इतका आहे . त्यांनी घेतलेले या जोखीमने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून (Success Story) टाकलं. मीडिया रिपोर्ट्स नुसार आजच्या घडीला जुपल्ली रामेश्वर राव हे 11400 करोड रुपयांचे मालक आहेत.