Success Story : आपण अनेक लोकांच्या कष्टाच्या कहाण्या ऐकतो, यातून एक गोष्ट तुम्हाला नक्कीच समजली असेल कि असा एकही माणूस नाही जो कष्ट करण्यावाचून यशवंत झाला. भारताला युवांचा देश म्हटलंय, जगाच्या तुलनेत आपल्याकडे असलेली युवकांची संख फार फार अधिक आहे. आणि देशातल्या प्रत्येक माणसाकडे, युवकाकडे स्वतःचा वेगळा विचार करून नवीन काहीतरी जगाला करून दाखवण्याची ताकद आहे. आपण कुठल्या परिस्थतीत जन्म घेतो हे आपल्या हातात नसतं, मात्र आपल्याला कुठल्या परिस्थितीत जगायचं आहे आणि त्यासाठी आपण किती मेहनत घेण्याची तयारी दाखवतो हे आपल्या हातात असत… अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शेतकऱ्याचा मुलगा झालाय कोट्याधीश: Success Story
आज आपण जी गोष्ट बघणार आहोत त्या मुलाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. ललित केशरे असं त्यांचे नाव असून आज ते कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत. आपल्या देशात आजकाल स्टार्टअपची चर्चा भरपूर आहे, अनेक जणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, आणि यातीलच एक म्हणजे ललित केशरे. या मुलाचे धाडस बघा, हातात असलेली लोखो रुपयांची नोकरी सोडून त्याने व्यवसाय सुरु केला, आणि फक्त सुरु केलाच नाही तर तर यश मिळवून दाखवले.
ललित केशरेबद्दल थोडक्यात:
ललित केशरे याचा जन्म मध्य प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला,ललितचे शालेय शिक्षण खरगोनमध्ये झालेआणि बारावीनंतर त्याने IIT बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवला. पदवी मिळवल्यानंतर त्याला फ्लीप्कार्टमध्ये नोकरी मिळाली, मात्र याच नोकरीवर पाणी सोडत आपल्या तीन सहकर्मचाऱ्यांसोबत (हर्ष जैन, ईशान बन्सल आणि नीरज सिंग) व्यवसाय सुरु केला.
काय आहे ग्रोब हि कंपनी?
ग्रोब हि कंपनी गुंतवणूकदारांना मदत करते. हि कंपनी शेअर्स, म्युचुअल फंड, IPO, एक्सचेंज ट्रेडेड फंड, फिक्स्ड डिपॉझिट्स इत्यादी विषयांबद्दल गुंतवणूक करण्याबद्दल थोडक्यात माहिती दिली जाते. या कंपनीचे यश म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सेक्वोया कॅपिटल आणि टायगर ग्लोबल सारख्या दिग्गजांची या कंपनीत गुंतवणूक केली आहे.