बिझनेसनामा ऑनलाइन | आपला नाव बनवणं, (Success Story) यशस्वी होणं हे अनेकांचे स्वप्न असत. प्रत्येकाची यश मिळवण्याची इच्छा असली तरीही त्याची व्याख्या मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनेकजण देशात राहून आपल करियर घडवतात तर काही लोकं करियर बनवण्यासाठी परदेशात जाऊन कष्ट घेतात. आपल्या प्रत्येकाच्या घरात कुणी न कुणी तरी असा नकीच असेल जो परदेशात जाऊन आपले काम सांभाळत आहे . आज आपण अश्या एक महिले बद्दल जाणून घेऊया जी अमेरिकेत राहून कमावते हजार नाही, लाख नाही तर तब्बल करोडो रुपये. त्यांचे नाव आहे नेहा नारखेडे. नेहा ह्यांचा जन्म पुण्यात झाला व आज अमेरिकेत यांची गणना काही सफल महिलांमध्ये केली जाते. त्यांना self made महिलांमधील एक मानलं जातं.
नेहा यांचे बालपण आणि शिक्षण :
नेहा यांचा जन्म पुण्याचा. त्या अस्सल मराठी आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आहे, आणि नंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. त्यानंतर काही वर्ष त्यांनी technical staff बरोबर काम केल आणि मग LinkedIn मध्ये नोकरी स्वीकारली. कामाची पावती म्हणून त्यांना प्रमोशन देऊन senior software engineer म्हणून बढती करण्यात आली.
Confluent ची सुरुवात ते आज : (Success Story)
नेहा ह्या अमेरिकेतील Confluent नावाच्या Software Company मध्ये Board Member व Co founder देखील आहेत. ह्या कंपनीची बाजरी किंमत 9.1 Billion Dollar आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 75 हजार करोडच्या सुमारास होते. अश्या ह्या कंपनीमध्ये नेहा ह्यांचा 6% वाटा आहे. नेहा ह्यांचे वयक्तिक Net Worth 520 Billion Dollar आसपास आहे, जे भारतीय रुपयांमध्ये मोजायला गेल्यास 42 हजार करोड रुपये आहे. लिंक्डडीनची नोकरी सोडाल्या नंतर त्यांनी आपल्या दोन साथीदारांसोबत वर्ष 2014 मध्ये Confluent ची सुस्वात केली. पहिल्या पाच वर्षांपर्यंत chief Technologist आणि Product Officer म्हणून जबाबदारी सांभाळली. आत्ता त्या ह्या कंपनीच्या बोर्ड मेम्बर आहेत. या कंपनीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी वर्ष 2021 मध्ये ऑलिसर नावाची अजून एक कंपनी सुरु केली व ह्याची देखील जबाबदारी त्या उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
नेहा ह्यानी आपल्या मेहनतीने आणि कष्टाने हे पद (Success Story) मिळवलं आहे. आपल्या यशाचे सारे श्रेय मात्र त्या आपल्या वडिलांना देतात. त्या म्हणतात की लहानपणी त्यांचे वडील इंदिरा गांधी, किरण बेदी, इंद्रा नुयी ह्यांची पुस्तक वाचायला द्यायचे आणि इथूनच त्यांना आयुष्यात काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली होती.