Success Story: मुकेश अंबानी यांची यशस्वी कारकीर्द आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि त्यांच्या नंतर अंबानींनीची मुलं देखील परिवाराच्या नावाला साजेशी कामगिरी पार पडताना दिसतात. आजकाल आपण स्त्री शिक्षण, स्त्री शक्तीकरणाबद्दल अनेक गोष्टी बोलतो म्हणूनच आज जाणून घेऊया रिलायन्स कंपनीच्या एक सबळ कार्यकर्त्या ईशा अंबानी यांच्याबद्दल. ईशा अंबानी या रिलायन्स रिटेलची जबाबदारी पाहतात. लाखो आणि करोडो रुपयांचा व्यवसाय त्या अगदी सहजपणे सांभाळता, मात्र यात मदतीचा हात कोणाचा?
ईशा अंबानींचा मदतनीस कोण?
ईशा अंबानी यांच्या उजवा हात म्हणून भूमिका बजावणारे दर्शन मेहता हे रिलायंस रिटेलचे अध्यक्ष आणि CEO आहेत. वर्ष 2006 मध्ये स्थापन झालेल्या रिलायंस ब्रँड्सचे ते पहिले कर्मचारी होते आणि 2008 पासून ते खुदरा कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, रिलायंस रिटेल भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी खुदरा कंपन्यांपैकी एक बनलेली पाहायला मिळते.
दर्शन मेहता यांनी CA पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, मात्र त्यानंतर त्यांच्या प्रवासाला वेगळीच कलाटणी मिळाली आणि त्यांनी जाहिरात क्षेत्रात उडी घेतली. असं म्हणतात की विविध कंपन्यांमध्ये काम करीत असताना मेहता त्यांनी 4.89 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती.
अनेक मोठाल्या कंपन्यांना भारतात आणल्या: (Success Story)
RBL ही रिलान्स रिटेलची मित्र कंपनी आहे आणि ती भारतात 700 पेक्षा जास्त स्टोअर्स चालवते. त्यांच्याजवळ 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. या कंपनीला 85 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतात आणण्याचे श्रेय दिले जाते, ज्यात बरबेरी, वैलेंटिनो, वर्साचे, बोट्टेगा वेनेटा, बालेनियागा, मार्क्स एंड स्पेंसर, टिफनी एंड कंपनी, जिमी चू, प्रेट ए मैंगर आणि पॉटरी बार्न यांचा समावेश होतो. दर्शन मेहता यांना टॉमी हिलफिगर, नौटिका आणि गैंट सारख्या ब्रँड्सना भारतात आणण्याचे श्रेय दिले जाते, तसेच त्यांनी एर्मेनेगिल्डो जेग्ना, ब्रूक्स ब्रदर्स आणि डीजल सारख्या ब्रँड्सची भारतात ओळख करून दिली असं म्हणतात.
रिलायंस रिटेलच्या यशाची कहाणी:
रिलायंस रिटेलची वेबसाइटनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये 2.6 लाख कोटीचा व्यवसाय केला (Success Story). मार्च 2023 पर्यंत कंपनी 7000 शहरांमध्ये 18,040 स्टोअर्स चालवत होती. मुकेश अंबानी यांच्या मालकीची जियो वर्ल्ड प्लाझा ही रिलायंस रिटेल समर्थित लक्झरी ब्रँडची हब आहे.