Success Story : व्यवसाय बुडाला असता तर 9-5 कामावर परत गेलो असतो म्हणत आज पूर्ण केली यशस्वी 10 वर्ष

Success Story: तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात एक असं प्रसिध्द व्यवसाय आहे जो तीन इंजिनियर्स आणि एका वकिलाने एकत्र येऊन सुरु केला होता. आजच्या ऑनलाईण जगात हा व्यवसाय भारतातील अनेक घरांमध्ये पोहोचलेला आहे. The Souled Store हे नाव तुम्ही कधी न कधी नक्कीच ऐकलं असेल, मात्र या व्यवसायाची सुरुवात कोणी, कधी व कशी केली हे माहिती आहे का? कंपनीने दहाव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पणे केल्यामुळे आज पाहूयात या व्यवसायाची भन्नाट गोष्ट…

कसा सुरु झालं हा व्यवसाय : Success Story

हर्ष लाल हा व्यवसाय सुरु करणाऱ्यांपैकी एक आहेत आणि आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणतात कि, जर का हा व्यवसाय बुडाला असता तर नक्कीच मी परत 9-5 ऑफिसकडे वळलो असतो. वर्ष 2013 मध्ये या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली होती जेव्हा आपल्याकडे हळूहळू इंटरनेटचा वापर करून शॉपिंग करता येतं हि संकल्पना रूढ होत होती. या काळात व्यवसाय सुरु केल्यामुळेच त्यांना लोकांच्या मनात विश्वास संपादन करायला मदत झाली. यंदा कम्पन्निओ आपल्या व्यवसायाची 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि चौघांसाठी हा प्रवास खूपच रंजक होता असं त्याचं म्हणणं आहे.

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ते सांगतात कि व्यवसायाची सुरुवात करताना त्याचं वय केवळ 23 वर्ष होतं. तीन इंजिनियर्स आणि एक वकील असा मिळून हा व्यवसाय सुरु करण्यात आला होता. वेदांग पटेल,आदीत्य शर्मा, रोहीण सामंताय आणि हर्ष लाल अशी या व्यावसायिकांची नावं असून एकाच्याही घरात व्यवसायाचे वातावरण नव्हतं नाही किंवा व्यवसाय कसा कराव याबद्दल माहिती नाही. एकदम शून्यातून केलेली हि सुरुवात आज भरपूर नफा कमावत आहे.