Success Story : आपल्या कामाबद्दल जर का आपण प्रामाणिक असू, किंवा काम आपल्याला आवडत असेल तर त्यात कितीही कष्ट आले तरीही ते सहन करत पुढे जाण्याची आपली तयारी असते. जगात असा एकही माणूस नाही ज्याने काहीही कष्टत न करता यश संपादन केलं आहे. आज आम्ही जी गोष्ट घेऊन आलो आहोत ती सुद्धा अश्याच एका कामाप्रती निष्ठा असलेल्या माणसाची आहे. हि गोष्ट आहे गुजरात मधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या जयंती कनानी या सामान्य माणसाची. कधी काळी त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती कि त्यांच्याजवळ फीचे पैसे भरायला देखील पैसे नसायचे. त्यांचे वडील हिऱ्यांच्या कंपनीमध्ये काम करायचे. जयंत याने B.Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं मात्र घारीची परिस्थिती पाहता त्याला पुढे शिक्षण घेता येणं हे जवळपास अशक्य होतं. त्यामुळे पदवी इलाव्लेल्या क्षणीच त्याने नोकरीचा शोध सुरु केला.
पहिल्या नोकरीतून मिळणारी कमाई फक्त सहा हजार रुपये एवढीच होती आणि वडिलांना झालेल्या शारीरिक आजारांमुळे घरची संपूर्ण जबाबदारी जयंती च्या खांद्यावर येऊन पडली. जयंती दिवसेंदिवस आपली मेहनत वाढवत होते, त्यांनी काही दिवसांतच नवीन नोकरी शोधली व फावल्या वेळात त्यांनी घरीच काही प्रोजेक्ट्स घ्यायला सुरुवात केली.
असा होता जयंती यांचा पुढचा प्रवास : Success Story
एका स्टार्टअप मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांची कष्टाची वेळ काही गेली नव्हती. स्वतःच्या लग्नाच्या वेळी सुद्धा त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार कायम होता. एका कंपनीमध्ये डेटा एनालीस्ट (Data Analyst) म्हणून काम करत असतानाच त्यांची भेट संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्याशी झाली. तिन्ही मंडळींना पैसे कमावण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. आणि 2017 मध्ये त्या तिघांनी मिळून पोलीगोन नावाची कंपनी सुरु केली.
हळू हळू कंपनीची प्रसिद्धी वाढू लागली आणि देश विदेशातून गुंतवणूकदार यांचा सहभाग वाढू लागला. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार टेक जज मार्क क्युबन यांनी देखील कामानिमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. वर्ष 2022 पर्यंत या कंपनीला टायगर ग्लोबल,सिकोया कोपिट इंडिया यांसारख्या गुंतवणूकदारांकडून त्यांना 450 मिलिअन डॉलर्सचा निधी मिळाला आहे. हि कंपनी इथ्रीयाम स्केलिंग आणि पायाभूत सुविधांची कामे सोपी करण्यात मदत करते, तसेच ती आपल्या ग्राहकांना एप्स तयार करायला मदत करते. आज या कंपनीची किंमत हजारो डॉलर्स आहे व ती जोमाने वाढणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे.