Success Story : IIT ची परीक्षा उत्तीर्ण न होता बनला “फिजिक्सवाला” ; आज आहेत 4400 कोटींचे मालक

Success Story : देशातील अनेक मुलं IIT-JEE, CAT, UPSC या सारख्या परीक्षा देतात. पण या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा रेट मात्र फारच कमी असतो. पण केवळ परीक्षा उत्तीर्ण करणारच माणूस हुशार असं आहे का? नाही! असं म्हणतात की परीक्षेच्या गुणांवर कोणाची बुद्धीमत्ता ठरत नसते. आणि तेच खरंच आहे, आज आम्ही तुम्हाला एका अश्या माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्याला IIT मध्ये प्रवेश नाही मिळाला तरीही तो आज अनेक मुलांना IIT च्या परीक्षेसाठी तयार करत आहे.

कोण आहे हा IIT चा शिक्षक (Success Story)

IIT च्या या शिक्षकाचे नाव आहे अलख पांडे, यांना सगळे “फिजिक्स वाला” म्हणून ओळखतात. युट्यूबवर असे अनेक क्लास चालतात जिथे ऑनलाईन JEE चे प्रशिक्षण दिले जाते. मात्र अलख पांडे यांची ख्यातीच वेगळी आहे. ते स्वतः हि परिक्षा पार करू शकले नसले तरीही B.Tech च्या डिग्रीविना त्यांनी शिकवण्या द्यायला सुरुवात केली होती .

युट्यूबवरून देतो प्रशिक्षण :

डिजिटल युगात जवळपास सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, देशातील अनेक लोकं अशी आहेत जी या सुविधेचा वापर करत मुलांना गरजेच्या असलेल्या गोष्टी शिकवतात. यांत शाळेतील शिक्षणापासून UPSC, MPSC परीक्षांचा समावेश आहे. अलख पांडे सुद्धा यातीलच एक आहेत, आजपर्यंत डिजिटल माध्यमांचा वापर करून त्यांनी अनेक विधार्थ्यांना शिकवण्या दिल्या आहेत.

आज 9100 करोड रुपयांची कंपनी असलेल्या पांडे यांनी केवळ 5,000 रुपयात सुरुवात केली होती. सुरुवातीलाच यशस्वी झाला असा एकही माणूस नाही, यश मिळवणं हि सोपी गोष्ट नाही. अलख पांडे यांची सुरुवातही काही प्रकारे अशीच होती, मात्र डिजिटल माध्यमाचा वापर करून त्यांनी यशस्वी शिक्षकापर्यंतचा प्रवास केला आहे (Success Story).

‘फिजिक्सवाला’ आज आहे एवढा प्रसिद्ध:

केवळ डिजिटल माध्यमांचा वापर करून मुलांना प्रशिक्षण देणारे अलख पांडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 9100 करोड रुपयांची एडटेक कंपनी विकत घेतली आहे. उत्तर प्रदेश मधील अनेक श्रीमंत उद्योजाकांपैकी एक म्हणजे अलख पांडे आहेत. फिजिक्स वाला या त्यांच्या कंपनीजवळ 61 युट्यूब चॅनेल आहेत, ज्यांचा वापर 31 मिलियन पेक्षा अधिक लोकं करतात.

फिजिक्स वाला हि कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत आहे. वर्ष 2021 मध्ये त्यांनी 9.4 करोड रुपयांचा प्रोफिट मिळवला ज्याची पुढे वाढ होत 2022 मध्ये हा आकडा 133.7 करोड रुपये आणि नंतर 2023 मध्ये 108 करोड रुपयांपर्यंत पोहोचला . यश कुणालाही सहज मिळालं नाही, कधी काळी अत्यंत कष्ट सहन केलेल्या अलख पांडे यांच्याकडे आज 4400 करोड रुपयांची एकूण संपत्ती आहे (Success Story),आणि भारतातील श्रीमंत माणसांमध्ये त्यांची गणना नक्कीच केली जाऊ शकते.