Success Story :आज देशात स्टार्ट अप व्यवसायांची मोठी चर्चा सुरु आहे. कित्येक तरुण या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतात, किंवा स्वतः असा एक व्यवसाय सुरु करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा यशस्वी माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात अनेक दुकानांमध्ये जाऊन सोन्याची विक्री केली होती आणि आज ते देशातील एक आघाडीचे सोन्याचे निर्यातदार (Exporter) आहेत. राजेश मेहता (Rajesh Mehta) असे या उद्योजकाचे नाव असून आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत.
कोण आहेत राजेश मेहता?
देशातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे राजेश मेहता यांनी केवळ 10 हजारांची गुंतवणूक करत हा व्यवसाय सुरु केला होता. आज राजेश एकस्पोर्ट (Rajesh Exports) हे नाव सर्वदूर आहे. आजच्या घडीला त्यांनी 13,800 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांची ही कंपनी सोन्याच्या वस्तू तयार करते आणि त्यांची विक्री करते. त्यांच्या कंपनीकडे दरवर्षी 400 टन सोन्याचं उद्पादन करण्याची ताकद आहे.
असा आहे राजेश मेहता यांचा प्रवास (Success Story):
लहानपणी आपण काही ना काही स्वप्न पाहतो, अनेक वेळा ‘मला डॉक्टर व्हायचं आहे’ असंच आपण सगळ्यांना सांगत असतो. राजेश मेहता यांची गोष्ट सुद्धा काहीशी अशीच आहे, त्यांना लहानपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मुळचे गुजराती असलेल्या मेहता यांनी बेंगलोर इथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील जसवंतरी मेहता हे कर्नाटकात दागिन्यांचा व्यवसाय करायचे, आणि वडिलांमुळेच त्यंना या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. घराण्यातून आलेला व्यवसाय चालवण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला मदत करायला सुरुवात केली, या क्षेत्रात सुद्धा त्यांना वेगळं काहीतरी करू नाव कमावण्याची इच्छा होती म्हणून भावाकडून 8 हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला.
अशी झाली व्यवसायाची सुरुवात:
राजेश मेहता हे सुरुवातीच्या काळात चेन्नईमधून दागिने खरेदी करून गुजरातच्या बाजारात विकायचे.काही काळ असे कष्ट केल्यानंतर मात्र त्यांना यश मिळायला सुरुवात झाली, व्यवसायात त्याचा जम बसू लागला तेव्हा त्यांनी घाऊक विक्रेत्यांना दागिने विकायला सुरुवात केली. आज राजेश मेहता यांचा व्यवसाय बेंगलोर, चेन्नई आणि हैद्राबाद मध्ये पसरलेला आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात असताना बेंगलोर इथे एक छोटंसं युनिट तयार करून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची विक्री ब्रिटन, दुबई, अमेरिका यांसारख्या मोठ्या देशांत करायला सुरुवात केली. आज त्यांच्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 138.18 बिलियन म्हणजे 13,800 कोटी रुपये आहे. भारतच नाही तर स्वीजार्लेंडमध्ये सुद्धा त्यांची गोल्ड रिफायनरी आहे, आपल्या देशात सोन्याचा एक उत्तम निर्यातदार म्हणून त्यांची ओळख आहे.