Success Story : नवरा होता कॅब ड्रायवर; आज बायकोने उभारलाय 39,921 कोटींचा व्यवसाय

Success Story : हल्लीच फोबर्सची नवीन यादी प्रकाशित झाली, ज्यात मुकेश अंबानी यांनी पहिले स्थान पटकावले. मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होतेच पण या यादीत नाव रुजू झाल्यामुळे आता यावर अधिकृतपणे शिकामोर्तब झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या यादीत अजून एक नाव आहे ज्या महिलेबद्दल तुम्हाला कदाचित जास्ती माहिती नसेल पण त्यांचा प्रवास हा सगळ्यांनाच भरपूर काही शिकवणारा आहे. खरं तर या महिलेच्या पतीचा कॅब ड्रायविंगचा व्यवसाय होता, परंतु असं असतानाही त्यांनी एवढा मोठा पल्ला कसा काय गाठला हे पाहूया….

Forbes च्या यादीत 100 श्रीमंत लोकांची नावं असतात, यात अनेक महिलांचाही समावेश आहे. यातलंच एक नाव म्हणजे रेणुका जगतीयानी. जगतानी यांचा पहिल्यांदाच या यादीत समावेश झाला आहे. इथे रेणुका यांचे नाव 44 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 39,921कोटी रुपये आहे. आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांमध्ये एक असेल्या रेणुका यांनी कधीकाळी भरपूर हालपेष्टा सहन केल्या होत्या. त्यांचे पती मिकी जगतीयानी आता हयात नाहीत, पण ते पूर्वी लंडनमध्ये कॅब ड्रायविंग करत होते. यानंतर ते बहारीन आणि नंतर दुबईमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आणि तिथे नवीन व्यवसाय उभा केला, हळूहळू हा व्यवसाय विस्तारित होत गेला आणि LandMark ग्रुपची सुरुवात झाली.

पतीच्या निधानंतर सांभाळला व्यवसाय : Success Story

पतीच्या निधानंतर व्यवसायाची सगळीच जबाबदारी 1933 मध्ये रेणुका यांच्या हाती आली. ते फेशन, इलेक्ट्रोनिक्स, फर्निचर आणि हॉटेल्सचा व्यवसाय करतात. घरी तीन मुलांची जबाबदारी आणि 4.8 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय त्या अत्यंत व्यवस्थित सांभाळत आहेत. दुबईत पतीकडून मिळालेला हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत त्याचा विस्तार भारतात करणाऱ्या रेणुकाच आहेत. आज त्यांनी जगातील 21 देशांमध्ये 2,200 पेक्षा जास्ती स्टोर्स सुरु केले आहेत. त्यांचा व्यवसाय वेगाने प्रगती करत असून हे केवळ रेणुका यांच्या कष्टांचे फळ आहे.