Success Story : यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय हे तर मेहनत करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती. अश्या माणसाला सहजासहजी कोणीही कमी लेखू शकत नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं आहेत ज्यांनी शून्यातून स्वर्ग उभा केल आहे. यातीलच एक नाव म्हणजे पूनम गुप्ता, हे नाव कदाचित तुम्ही याआधी ऐकलं नसेल पण त्यांची गोष्ट नक्कीच ऐकावी आणि वाचावी अशीच आहे. काही वर्षांपूर्वी केवळ रद्दी खरेदीच्या कल्पनेतून आज त्यांनी 800 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे..
कोण आहेत पूनम गुप्ता:
पूनम गुप्ता या मुळच्या दिल्लीच्या रहिवासी आहेत, इथूनच त्यांनी इकोनोमिक्समधली पदवी मिळवली आहे. यानंतर साधारण सगळेच करतात तशीच त्यांनीही पद्विउत्तर शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी MBA मध्ये पदवी मिळवली. यानंतर मात्र त्यांचा खरा प्रवास सुरु (Success Story) झाला कारण प्रयत्न करूनही नोकरी मिळवण्यात त्या अपयशी ठरत होत्या. वर्ष 2002 मध्ये त्यंनी पुनीत गुप्ता यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि दोघे स्कॉटलेंडला राहायला गेले पण तिथे देखील यश काही पूनम यांना गवसलं नाही.
पण आज उभारली 800 कोटींची कंपनी : Success Story
नोकरीच्या शोधात असताना पूनम याचं फिरणं भरपूर व्हायचं कधी या कार्यालात तर कधी त्या. मात्र सगळीकडेच त्यांनी ए गोष्ट नेहमीच पहिली टी म्हणजे रद्दी.आणि इथूनच त्यांच्या मनात एक कल्पना सुचली टी म्हणजे राद्धीचं रिसायकलिंग करण्याची, त्यांनी जिद्धीने या व्यवसायाची सुरुवात केली आणि यात मोठी मदत मिळाली टी स्कॉटलेंड सरकारकडून, कारण सरकार कडून त्यांना 1,00 ,000 रुपयांचा प्रारंभिक निधी मिळाला होता.वर्ष 2003 पासून त्या या व्यवसायात कार्यरत आहेत. त्या रद्दी विकत घेतात व त्यांचे रिसायकलिंग करून त्यापासून नवीन व चांगल्या दर्ज्याचे पेपर तयार करतात.कुणा एके काळी केवळ 1 लाख रुपयांची मदत घेऊन सुरु केलेला हा व्यवसाय आज 800 कोटी रुपयांचा उच्चांक गाठू शकलाय तो केवळ पूनम गुप्ता यांच्या मेहनतीमुळेच.