Sudha Murthy : “नारायण मूर्ती हे कॉर्पोरेट गांधी आहेत, पण मी कस्तुरबा नाही” ;सुधा मूर्ती यांच्या वाक्यामागची Inside Story काय?

Sudha Murthy: आपण नेहमीच नारायण मूर्ती यांना त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे ओळखतो. Infosysच्या सुरुवातीला नारायण मूर्ती यांनी अगदी जीव ओतून कष्ट घेतल्यामुळे आज हि कंपनी देशातील द्वितीय दर्जाची सर्वात मोठी IT कंपनी बनली आहे. काही दिवसांपूर्वी 70 तास काम करण्यावरून नारायण मूर्ती हे सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. या मताला काही जणांनी दुजोरा दिला, तर दुसऱ्या बाजूने विरोधही झाला. आज मात्र आपण त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या एका खास वक्तव्याबद्दल जाणून घेऊया. सुधा मूर्ती असं म्हणतात की, सध्या त्या उतरत्या वयात आहेत पण तरीही 70 तास काम करतात. सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्तींना पूर्णपणे समर्थन देत अस म्हटलं की आपण परिवारासोबत Quantity Time पेक्षा, किती Quality Time घालवत आहोत याबद्दल विचार केला पाहिजे.

सुधा मूर्ती आजही करतात 70 तास काम: (Sudha Murthy)

प्रसिद्ध लेखिका आणि इंजिनियर सुधा मूर्ती या नेहमीच त्यांच्या साध्या-सोप्या लिखाणामुळे ओळखल्या जातात. India Today चे Consulting Editor राजदीप सरदेसाई यांनी सुधा मूर्ती यांची मुलाखत घेतली होती. जिथे त्यांनी सुधा मूर्तींना नारायण मूर्ती यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बद्दल काही प्रश्न विचारले होते, यामध्ये ते विचारतात की, “तुम्हा दोघांमध्ये Uncommon Love कसं काय आहे?” यावर सुद्धा मूर्ती म्हणाल्या की, “नारायण मूर्ती हे कॉर्पोरेट गांधी आहेत, पण मी कस्तुरबा नाही.”

गेल्या काही दिवसांपूर्वी 70 तास काम करण्यामुळे नारायण मूर्ती सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत देशातील युवकांना अधिकाधिक काम करण्याचा सल्ला दिला होता. मुलाखती दरम्यान सुधा मूर्तीनी देखील नारायण मूर्तींच्या याच सल्ल्याला दुजोरा देत म्हटलं की, “मी स्वतः आज देखील दर आठवड्याला 70 तास काम करते. प्रत्येकाला स्वतःच्या कामाप्रती प्रेम असलं पाहिजे, आणि सुट्ट्यांमध्ये देखील काम करण्याची तयारी असली पाहिजे.”

Quality Time सर्वात महत्त्वाचा:

मुलाखती दरम्यान सुधा मूर्ती(Sudha Murthy) पुढे म्हणाल्या की नारायण मूर्ती यांचा कठोर परिश्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून येतो, कारण ते नेहमीच पुरेसे प्रयत्न करण्याच्या तत्त्वावर ठाम राहिले आहेत. नारायण मूर्ती म्हणतात की Infosysला सुरुवातीच्या काळात बाजारात घट्ट पाय रोवण्याची गरज होती, त्यामुळे ते नेहमी दर आठवड्याला 85 ते 90 तास काम करायचे. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी कधीही परिवाराला अंतर दिलेले नाही. मूर्ती दांपत्याच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या परिवारासोबत Quantity पेक्षा किती जास्त Quality Time घालवतो हे महत्त्वाचं आहे.

त्यासोबत एक उदाहरण देत ते सांगतात की, रात्री सव्वा नऊ वाजता घरी आल्यानंतर नारायण मूर्ती परिवाराला घेऊन जेवण करायला जायचे. परिवारासोबतचे हे दोन, अडीच तास मूर्ती दांपत्य अगदी आरामात घालवायचे. तसेच त्यांनी आपल्या परिवाराला कठीण काळात नेहमीच सोबत असण्याची हमी दिली होती.