Sukanya Samriddhi Yojana : खाते बंद पडलं म्हणून चिंतेत आहात? जाणून घ्या नेमका पर्याय काय?

Sukanya Samriddhi Yojana : भारत देशातील मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध प्रकार योजना राबवत असतो. अश्या अनेक योजनांद्वारे मुलींच्या जन्मापासून, शिक्षण ते थेट लग्नापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. देशात वाढत असलेले स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार कमी करण्यासाठी,आणि देशातील मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढवण्यासाठी सरकार अशी महत्त्वाची पावले उचलत आहे. यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना. आत्तापर्यंत सुकन्या समृद्धी योजनेची चर्चा प्रत्येक गावात आणि शहरात सुरु झाली आहे, अनेक माणसं याबद्दल जागृत होत आहेत. मात्र काही कारणास्तव जर का तुमचं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं बंद झालेलं असेल आणि तुम्हाला पुन्हा ते सुरू कसं करता येईल हा प्रश्न सतावत असेल तर काळजी करू नका आज आम्ही याबद्दलच तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहोत…

काय आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

देशातील मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या अंतर्गत पालकांना सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. योजनेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या खात्याची जबाबदारी मुलीचे पालक उचलतात आणि या योजनेमध्ये मुलीच्या पालकांना पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षानंतर गुंतवणुकीचा कालावधी संपतो आणि तुम्ही रक्कम परत मिळवू शकता. आत्ताच्या घडीला सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्क्यांचं व्याज दिलं जात आहे, त्यामुळे अशी संधी कुठल्याही पालकाने नक्कीच गमावू नये. या संधीचा वापर करून तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीचं भविष्य उज्वल बनवू शकता.

समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते?

योजनेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मिळणारा व्याजदर होय. इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samriddhi Yojana) अंतर्गत मिळणारा व्याजदर हा चांगला आहे, तुम्ही कितीही कमी रक्कम गुंतवणात असाल तरी सुद्धा त्यातून मिळणारा परतावा हा मोठा असणार आहे. ही योजना योजना अमुक एका रकमेची गुंतवणूक करण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकणार नाही, कमीत कमी 250 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा इथे उपलब्ध आहेत.तसेच या योजनेत तुम्हाला कुठल्याही बाजारातील परिस्थितींचा विचार करण्याची भीती नसते. योजनेत मुलीच्या नावे खातं उघडण्यावर काही विशेष नियम नाहीत. हे खातं पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही उघडलं जाऊ शकतं.

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं पुन्हा सुरू कसं करावं?

कुठल्याही तांत्रिक किंवा इतर अडचणींमुळे जर का या योजनेअंतर्गत चालू केलेलं तुमचं खातं बंद झालं असेल तर काळजी करू नका, यासाठी तुम्ही जिथे खातं उघडलं आहे त्या पोस्ट ऑफिस किंवा बँकला ताबडतोब जाऊन भेट द्या. तिथे गेल्यानंतर कर्मचारी तुम्हाला खातं पुन्हा सुरू करण्यासाठी एक फॉर्म देतील आणि तेव्हाच या फॉर्म सोबत जेवढी रक्कम भरायची बाकी आहे तेवढे पैसे भरावे लागतील आणि प्रतिवर्षांनुसार 50 रुपये एवढा दंड देखील भरावा लागेल, यानंतरच सुकन्या समृद्धी योजनेचं (Sukanya Samriddhi Yojana) खातं पुन्हा सुरू होईल.