बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील बँकिंग क्षेत्र जितके बचतीसाठी, भविष्याच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावत असते तितकेच भारतीय पोस्ट खाते हि विविध योजनांच्या आधारे सामान्यजनांचा कल बचतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असते . त्यासाठी ते वेळोवेळी गुंतवणूकीचे नवनवीन पर्याय उपलब्ध करून देत असतात. काही काळाआधी भारतीय पोस्ट खात्याने मुलींसाठी Sukanya Samriddhi Yojana अमंलात आणली होती ज्याचा फायदा हा मुलींना त्यांच्या वाढत्या वयासोबत होणार आहे . जर योग्यरीत्या गुंतवणूक केली तर तुमची मुलगी वयाच्या 21 व्या वर्षीच त्या कोट्यधीश बनू शकते . तर जाणून घेऊयात Sukanya Samriddhi Yojana कसे काम करते आणि कश्या प्रकारे तुमच्या मुलीला कोट्याधीश करू शकते ह्याबद्दल .
मुलीला वयाच्या २१ व्या वर्षी करोडपती करायचं असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीच्या जन्मापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करावी लागेल. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे पालक त्यांच्या मुलींच्या नावावर Sukanya Samriddhi Yojana खाते उघडू शकतात.मुलीच्या 18 वर्षांनंतर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्धी रक्कम काढू शकता. 21 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला संपूर्ण रक्कम काढता येते. मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च ही योजना उचलते.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत किती व्याज मिळत आहे
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी व्याज वाढ केली जाते. सरकारने एप्रिल ते जून या तिमाहीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. आता हे वार्षिक व्याज 8 टक्के करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकार या योजनेत वार्षिक 7.60 टक्के व्याज देत होती . म्हणजेच, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीसाठी व्याज 40 bps ने वाढले असेल . या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.
मुलगी 21 वर्षांनी कोट्याधीश कशी होईल
एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खात्यात गुंतवणूक केली, तर तो पुढील 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकेल. याशिवाय, जर एखाद्या पालकाने आपली मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मॅच्युरिटी रकमेच्या 50 टक्के रक्कम काढली नाही, तर तिला 51 लाखांची मॅच्युरिटी रक्कम मिळेल. या योजनेमध्ये एकूण 18 लाख रुपये गुंतवले जातील आणि 21 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर 33 लाख रुपये व्याज मिळेल . म्हणजेच, जर एखाद्या पालकाने मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात दरमहा 10,000 रुपये जमा केले तर त्यांची मुलगी वयाच्या 21 व्या वर्षी कोट्याधीश होईल.