Surat Diamond Bourse : हिऱ्यांचा व्यापार पुन्हा मुंबईत; सुरतपेक्षा मुंबई परवडली असं का?

Surat Diamond Bours : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 डिसेंबर रोजी गुजरात मध्ये Surat Diamond Bours चे उद्घाटन करण्यात आले होते आणि ही जगभरातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून ओळखले जात होती. इथे जवळपास 4,200 पेक्षा अधिक व्यापारी कार्यालये आहेत. आतापर्यंत मुंबईला आपण आर्थिक राजधानी असे म्हणत होतो, तसेच मुंबई हे हिऱ्याच्या व्यापाराचे केंद्रबिंदू आहे, मात्र माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सुरत मध्ये Surat Diamond Bours चे उद्घाटन झाल्यामुळे सुरत याच ठिकाणी हिराच्या व्यापाराचे एक मोठे केंद्र तयार होईल अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती. आता मात्र या बाबतीत एक महत्त्वाची बातमी जाहीर झाली असून या Surat Diamond Bours साठी पुढाकार घेतलेले प्रख्यात हिऱ्यांचे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी हाच व्यवसाय मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतलाय.

हिऱ्यांचे ठिकाण पुन्हा एकदा मुंबईमध्ये: (Surat Diamond Bours)

काही दिवसांपासून सुरत मध्ये हिऱ्यांचा मोठा व्यवसाय उभा राहील किंवा सुरत हेच आता हिऱ्यांच्या व्यापाऱ्याचे केंद्र बनेल अशा अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र आता वल्लभभाई लखानी या प्रख्यात हिरांच्या व्यापाऱ्याने पुन्हा एकदा हा व्यवसाय मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण बाजारी क्षेत्रात खळबळ सुरु झाली आहे. सुरत हे हिरांच्या व्यापारासाठी योग्य ठिकाण नाही, इथे सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे म्हणूनच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी स्थलांतर करायचे नाही व म्हणूनच संपूर्ण व्यापार पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने वळवला गेला आहे.

लक्षात घ्या की सुरत मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत सर्वात मोठी होती, कदाचित हा हिऱ्यांच्या व्यापाऱ्याचा केंद्रबिंदू ठरला देखील असता. जवळपास 35.54 एकर मध्ये पसरलेली ही इमारत सध्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलेली आहे, याचे एकूण क्षेत्र हे 67 लाख चौरस फूट आहे(Surat Diamond Bours). सुरत मध्ये बांधलेल्या या मेगा स्ट्रक्चरला (Mega Structure) एकूण नऊ ग्राउंड टॉवर आणि पंधरा मजले आहेत. यामध्ये 300 चौरस फूट ते 1 लाख चौरस फुटांपर्यंतच्या 45 अधिक कार्यालयीन जागा आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे. अगदीच सर्व सोयीनीं परिपक्व अशा या इमारतीत कॉन्फरन्स हॉल, मल्टीपर्पज हॉल, रेस्टॉरंट, बँक, कन्वेंशन सेंटर, प्रशिक्षण केंद्र अशा अनेक सुविधा होत्या मात्र तरीही पुन्हा एकदा हा संपूर्ण व्यापार हा मुंबईकडे हलवण्यात आला आहे.