Surat Diamond Bourse : भारतात सध्या हिऱ्यांचा सर्वात मोठा व्यवसाय सुरु झालाय कारण सुरत मध्ये आता हिऱ्यांची सर्वात मोठी इमारत उभी राहिली आहे. या बाजारात एकूण 4500 कार्यालयांचा समावेश झाला आहे. यांमध्ये मुंबईतील एकूण 26 व्यापाऱ्यांनी आपली कार्यालये स्थलांतरित केली असून आज म्हणजेच मंगळवारपासून सुरत डायमंड बोर्सची 135 कार्यालये औपचारिकपणे व्यवसायासाठी उघडली जाणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सुरतमध्ये डायमंड बोर्सच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती, आणि आज हे बांधकाम सुरतच्या खजोद येथील ड्रीम सिटीमध्ये पाहायला मिळते.
जगातील सर्वात मोठा हिऱ्यांचा बाजार सुरतमध्ये: (Surat Diamond Bourse)
आजपासून सुरतमध्ये सुरु झालेल्या हिऱ्यांच्या बाजाराला (Surat Diamond Bourse) आपण जगातील सर्वात मोठा हिऱ्यांचा बाजार म्हणू शकतो. इथे एकूण 135 हिऱ्यांचे व्यापारी व्यवहार करणार आहेत. समोर आलेली माहिती सांगते कि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर रोजी या बाजाराचे औपचारिक रीत्त्या उद्घाटन करणार आहेत. वर्ष 2014 मध्ये सुरत येथे आनंदीबेन पटेल यांची सत्ता होती आणि काही व्यावसायिकांनी त्यांची भेट घेत हिऱ्यांचा व्यवसाय मुंबईमध्ये नाही तर सुरतमध्ये सुरु व्हावा अशी याचिका सदर केली. त्यांचे म्हणणे पटल्यामुळे त्याचवेळी आनंदीबेन यांनी व्यावसायिकांना 1000 एकरहून अधिक जमीन देऊ केली होती.
अनेक वर्षांपासून आपण सुरतला डायमंड सिटी म्हणून ओळखतो कारण इथे चालू असलेल्या हिऱ्यांच्या व्यवसायाने अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. सुरतमध्ये बनणारे हे हिरे अनेक देशांमध्ये निर्यात (Diamond Export) केले जातात, आणि अनेक दिवसांपासून हि निर्यात करण्यासाठी मुंबई विमानतळाचा वापर केला जात असे. मात्र आता असे होणार नाही कारण आता सुरतमधली डायमंड सिटी हि जगातली सर्वात मोठी हिऱ्यांच्या व्यवसायाची इमारत उभी राहिली आहे. इथे व्यापाऱ्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे ते मुंबई शहरावर अवलंबून नाहीत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात व्यापारी सुरतला स्थलांतरित होत आहेत.