बिझनामा ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात पडझड सुरु असताना काही पेनी स्टॉक खरेदीसाठी गुंवणूकदारांची झुंबड पहायला मिळत आहे. ज्या शेअरचे नाव आहे सुझलॉन एनर्जी पवन ऊर्जेच्या निर्मितीत सध्या आघाडीला असणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आज बुधवारी 17/05/2023 रोजी 4 टक्क्यांहून अधिक वधारला असून कंपनीचे शेअर्स रु.8.65 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कारण नुकतीच कंपनीला एक ऑर्डर मिळाली आहे.
शेअर बाजारातीळ उपलब्ध माहिती नुसार, सुझलॉन एनर्जी कंपनीला 99 मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी व्हायब्रंट एनर्जीकडून 33 विंड टर्बाइन जनरेटर (WTG) ची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने म्हटले आहे की हा प्रकल्प 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 307 हजार घरांना वीजपुरवठा करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याच वेळी, दरवर्षी 2.92 लाख टन CO2 उत्सर्जन रोखले जाऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार ह्या प्रकल्पासाठी सुझलॉन एनर्जी विंड टर्बाइनचा पुरवठा करेल.
याआधी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तीन वर्षांच्या कालावधीत 260% पर्यंत परतावा दिला आहे. जानेवारी 2008 मध्ये हा स्टॉक 375 रुपयांवर होता, जो आता 9 रुपयांच्या खाली आहे. याचा अर्थ 14 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 98 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 28 जुलै 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 5.43 रुपये नोंदवली आहे तर 20 डिसेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 12.19 रुपये होती. स्टॉकची हि गेल्या 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे. मार्केट कॅप रु 10,258.28 कोटी आहे.
सुझलॉन एनर्जीने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नाहीत. मात्र, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल 910.77 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीला 88.24 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 14.50 टक्के आहे. तर, सार्वजनिक भागीदारी 85.50 टक्के आहे.