बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर सुजलोन एनर्जीच्या शेअर्समध्ये (Suzlon Share Price) मोठी उलथापालथ झाली असून अवघ्या ३ महिन्यात शेअर्स दुप्पट झाले आहेत. याबाबत स्वतः कंपनीने खुलासा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार एवररेन्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या १००.८ MW विंड पॉवर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यांमध्ये कंपनीचे शेअर्स ९ रुपयांपासून थेट १८ रुपयांपर्यंत वाढले आहेत.
सुजलोन (Suzlon Share Price) आपल्या S120-2.1MWच्या प्लॅटफॉर्मवर ४८ विंड टरबाइन जनरेटरला करुर जिल्ह्याच्या वेल्लियानानी फेज २ आणि तामिळनाडू मधील त्रिचीच्या वेंगईमंडलम मध्ये एका हायब्रीड जाली ट्यूबलर टॉवर सोबत प्रस्थापित करणार आहे. या प्रोजेक्टला मार्च २०२४ पासून सुरुवात होईल. सदर प्रकल्पाअंतर्गत ६५,००० घरांना वीज पुरवठा करण्यात येऊ शकतो, तसेच दरवर्षी २.५८ लाख टन CO2 चे उत्सर्जन रोखले जाऊ शकते.
स्टॉक एक्सचेंज फायलींगच्या अनुसार सुजलोन विंटरबाइन इक्विपमेंट्सचा सप्लाय करेल आणि प्रोजेक्टच्या एक्झिक्युशन आणि कमिशनिंगची निगराणी करेल.या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ऊर्जाचे लक्ष हे व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक वर्ग असतील जेणेकरून भारतात रिनिवेबल एनर्जीचा उपयोग वाढला जाईल असे वक्तव्य सुजलोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे पी चसलानी यांनी केले.
एवर न्यू एनर्जी हा एक उत्तम ट्रॅक रेकॉर्ड आणि 5.5GW चा पोर्टफोलिओ असलेला एक अग्रगण्य सौर ऊर्जा विकासक आहे . एवर न्यू ने युटीलिटी स्केल फॉर्म ऊर्जा प्रकल्पांचा pan-India पोर्टफोलिओ विकासित करण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या सेवांमध्ये पवन संसाधन मूल्यांकन, सौर मुल्यांकन, साईट आयडेंटीफिकेशन, भूसंपादन आणि विकास, कमिशनिंग, मालमत्ता व्यवस्थापन इत्यादींचा समावेश असतो.
सुजलान एनर्जीचा स्टॉकमध्ये तेजी- (Suzlon Share Price)
सुझलोन कंपनीच्या शेअर्सची किंमत तीन महिन्यात द्विगुणित झालेली असून ११९.८८% झाली आहे. एका महिन्यात कंपनीचा स्टॉक २२.९२% होता तर वर्षभरात कंपनीचा प्राईस परफॉर्मन्स १७८.७% झाला आहे. नुकताच सुझलोन एनर्जी कंपनीला गुजरात मधील के पी ग्रुप्सकडून ४७.६MW पवन ऊर्जा क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर देण्यात आली होती. शुक्रवार दिनांक १४ जुलै २०२३ रोजी सुजलोन एनर्जी कंपनीचे शेअर ०.८५% घसरणी सह १७.४० कि६मतीवर ट्रेड करीत आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीचा निकाला दरम्यान जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन सुजलाने केले, त्यानंतर सुजलान एनर्जीचा स्टॉकची (Suzlon Share Price) किंमत देखील तेजीत वाढताना दिसली.