Suzlon Share Price: आपल्या देशातील अक्षय ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास Suzlon ही सर्वात प्रसिद्ध कंपनी आहे, आणि वेळोवेळी ती गुंतवणूकदारांना आनंदाच्या बातम्या देत असते आणि शेअर बाजाराबद्दल जाणून घेण्यात इच्छुक असलेला प्रत्येक माणूस देखील Suzlonच्या शेअर बद्दल जाणून घेतच असतो. गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीत उतरणाऱ्या या कंपनीने आज पुन्हा एका नवीन विक्रम रचून दाखवला आहे. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरने नवीन उचांक गाठलेला असून Suzlonचा भाव आज 50 रुपयांच्या वर गेला आहे.
Suzlonच्या शेअर्सनी आज रचला नवीन विक्रम: (Suzlon Share Price)
काल अर्थसंकल्प सादर होत असतानाच Suzlonच्या शेअर्सनी चढता क्रम पकडला होता, आणि आजच्या बाजारी कामकाजात देखील या कंपनीने हीच कामगिरी सुरु ठेवली होती. काल अप्पर सर्किट गाठल्यानंतर आज सुझलॉनच्या शेअरने आज 50 रुपयांची पातळी ओलांडली आणि एक नवीन विक्रम रचला. याआधी 5 ऑगस्ट 2011 रोजी कंपनीचा शेअर 50 रुपयांवर पोहोचला होता, आणि आज म्हणजेच तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा एकदा कंपनी तो टप्पा गाठण्यात यशस्वी झाली आहे.
Suzlonच्या शेअर वाढीचं कारण काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्प सादर करताना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत, देशभरातील 1 कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, ज्यामुळे प्रत्येक कुटुंबाची वर्षभरात 18 हजार रुपयांची बचत होईल. या योजनेचा थेट फायदा सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
आज सकाळी सुझलॉनच्या शेअरच्या भावांवर याच घोषणेचा परिणाम दिसून आला. सुझलॉनच्या शेअरने पुन्हा एकदा 50 रुपयांची पातळी गाठण्याचा विक्रमी पराक्रम गाजवला आहे(Suzlon Share Price). कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा सुमारे 160 टक्क्यांनी वाढून 203.4 कोटी रुपये झाला होता, त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा कंपनी आणखीन प्रगती करून दाखवेल हे नक्की.