Suzlon Share Price : आपल्या देशातील एक शेअर बाजार हा व्यवस्थित पकड धरून कार्य करत आहे आणि त्याची हीच कामगिरी अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून अनेक कंपन्या या शेअर बाजारामध्ये भरगोस गुंतवणूक करत असतात. तुम्ही जर का शेअर बाजारावर विशेष लक्ष दिलंत तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी या कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक म्युचल फंडच्या संस्थांनी गुंतवणूक केली होती मात्र आपल्या देशांतर्गत येणाऱ्या याच म्युचल फंडस्नी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी मधला आपला 1.33 टक्क्यांपर्यंतचा वाटा खाली आणला आहे. अचानक या कंपन्यांनी सुझलॉन मधली गुंतवणूक मागे घेतल्यामुळे नक्कीच याचा परिणाम कंपनीवर झालेला दिसून येईल, त्यामुळे एकूण नेमकं प्रकरण काय आहे हे आज जाणून घेऊया…
सुझलॉन एनर्जी मध्ये किती होती गुंतवणूक? (Suzlon Share Price)
सप्टेंबर 2023 च्या तिमाही पर्यंत सुजलोन एनर्जी मध्ये देशांतर्गत येणाऱ्या म्युचल फंड कंपन्यांनी एकूण 4.7 टक्क्यांचा वाटा मिळवला होता. कंपनीचा रेकॉर्ड पहिला तर जून 2023च्या तिमाही पर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये म्युचल फंड्सची फक्त 0.7 टक्के एवढीच गुंतवणूक होती, याचाच अर्थ मधल्या काळात सुजलॉन कंपनीसोबत म्युचल फंड्स कंपन्यांची गुंतवणूक अधिकाधिक दराने वाढलेली होती. 24 जानेवारी 2024 रोजी एनर्जीचा स्टॉक 0.2 टक्क्यांच्या वाढीसह 41.20 रुपयांवर बंद झाला.
आता सुजलॉनची एकूण परिस्थिती कशी आहे?
याच दरम्यान बंधन कोअर इक्विटी म्युचल फंडने(Bandhan core equity fund) सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत कंपनी मधला 1.23 टक्क्यांचा भाग मागे घेतला. तसेच सप्टेंबरच्या तिमाहीत बँक ऑफ बरोडाने सुद्धा सुझलॉन मध्ये 1.5 टक्क्यांचे भांडवल धारण केले होते जे की आता कंपनीच्या शेअर होल्डिंग लिस्टमध्ये दिसत नाही याचा अर्थ बँक ऑफ बरोडाने देखील सुझलॉन मधून काढता पाय घेतला आहे(Suzlon Share Price).
एवढेच नाही तर ब्लॉक रॉक कंपनीची युनिट ishares Global आणि iShares Global Clean Energy ETF यांनी देखील कंपनीमध्ये भली मोठी गुंतवणूक केली होती, या दोन्ही कंपन्यांनी सुझलॉनमध्ये 1.41 व 1.09 टक्के अनुक्रमे गुंतवणूक केली होती मात्र 3.48 टक्के असलेला त्यांचा वाटा डिसेंबरच्या तिमाहीत 2.73 वर येऊन पोहोचलेला आहे.
सुझलॉन ही आपल्या देशातील एक सुपरहिट कंपनी आहे आणि 2023 डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीला 3 megawatt पवन ऊर्जा टरबाइनचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर मिळाली होती. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचा परत कमवून दिला होता आणि एकूणच बारा महिन्यात कंपनीच्या स्टॉक्सची किंमत 200 टक्क्यांनी वाढली होती.