बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy IPO) शेअर बाजारात आपला IPO आणण्याची तयारी करत आहे. कंपनी 2024 मध्ये स्टॉक मार्केटवर लिस्टेड होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे स्विगीची पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेली झोमॅटो ही कंपनी आधीच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहे. त्यामुळे आता Swiggy इथे लिस्टेड झाल्यानंतर इथेही दोन्ही कंपनी मध्ये सामना पाहायला मिळू शकतो.
7 नवीन बँकांना सोबत जोडणार?- Swiggy IPO
वर्ष 2022 मध्ये Swiggy चं Market Valuation कमी होत 10.7 बिलिअन डॉलर झालं होतं. मात्र आत्ता देशी तसेच विदेशी बाराजांमध्ये सुधारणा होत असल्याने Swiggy ने आपला IPO वर काम करायला सुरुवात केलेली आहे. Swiggy ने सात नवीन बँकांना सोबत जोडत IPO ची योजना परत सुरु केली आहे. या investors मध्ये Morgan Stanly, JP Morgan आणि Bank Of America चा समावेश आहे.
कधी येणार Swiggy चा IPO-
Swiggy Company चं Market Valuation मे महिन्यात Billion Dollars च्या आसपास होतं. आयपीओसाठी Swiggy ने 10.7 billion dollars चा बेंचमार्क म्हणून वापर करायचा ठरवलं आहे. सर्व काही व्यवस्थित झाल्यास जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंत Swiggy आपला आयपीओ (Swiggy IPO) बाजारात आणू शकते. यापूर्वीही स्विगीने शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखली होती, परंतु शेअर बाजारातील त्यावेळच्या घसरणीमुळे कंपनीकडून ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती.