Swiggy वरून जेवण मागवणं होणार महाग? नेमक्या कोणत्या शुल्कात केली वाढ?

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या देशात Swiggy आणि Zomato ची चर्चा जोराने सुरु आहे. कितीतरी लोकं ऑनलाईन जेवण मागवून त्याचा आनंद घेतात. मनात आलेल्या चवीची मागणी इथे पूर्ण केली जाते. वेळोवेळी ते आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या ऑफर्स देऊ करतात, आणि त्यांना खुश करतात. मात्र वाढत्या महागाई सोबतच Swiggy वरून जेवण मागवणंही महाग झालेलं आहे.

Swiggy झालंय महाग:

फूड डिलिव्हरी करणारी कंपनी Swiggy आता महाग झाली आहे, कारण त्यांनी आपली प्लेटफॉर्म फी वाढवली आहे. हा नवीन आकडा 4 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाला आहे. याआधी हि कंपनी 2 रुपये फी आकारात होती आणि आता त्यात वाढ करून हा आकडा 3 रुपये करण्यात आला आहे. Swiggy ची प्रतिस्पर्धी म्हणून ओळखली जाणारी कंपनी Zomato यांनी देखील आपली प्लेटफॉर्म फी 2 रुपये ठेवली आहे, मात्र काही ठिकाणी ते सुद्धा 3 रुपये शुल्क आकारतात.

सगळ्यात आधी हे नवीन शुल्क बंगलोरच्या शहरात लागू करण्यात आलं होतं आणि आता हळूहळू हे चित्र सर्वत्र पसरणार आहे. सध्याची Swiggy कडून आकारली जाणारी फी 5 रुपये असली तरीही 2 रुपयांची सूट दिल्यामुळे ती 3 रुपये झाली आहे. पण यामूळे खुश होण्याची गरज नाही, कारण येणाऱ्या दिवसांत या शुल्कामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

यावर काय म्हणते कंपनी?

लक्ष्यात घ्या कि प्लेटफॉर्म फी म्हणजे डिलिव्हरी फी नाही, प्लेटफॉर्म फी हे वेगळे आकारले जाणारे शुल्क आहे. शुल्क वाढीबद्दल बोलताना Swiggy कंपनी म्हणाली कि त्यांच्याकडून अद्याप प्लेटफॉर्म फी मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, ते अजूनही 3 रुपयांची प्लेटफॉर्म फी आकारतात आणि इतरांच्या तुलनेत हि रक्कम फारच क्वचित आहे असंही ते पुढे म्हणाले.