Swiggy One Lite Membership : Swiggy ची भन्नाट ऑफर!! सलग 3 महिने फ्री डिलिव्हरी आणि बंपर डिस्काउंट

Swiggy One Lite Membership । ऑनलाईन पदार्थ मागवून खायला आवडतात का? म्हणजे नक्कीच स्वीगी(Swiggy) आणि झोमेटो(Zomato)चे चाहते असाल. आज आम्ही तुमच्या ह्याच आवडीबद्दल एक खास बातमी देणार आहोत, जी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. या ऑनलाईन पदार्थांच्या सोयीमुळे आयुष्य खरच फार सोपं झालाय. घरात कष्ट करत जेवण बनवण्याची गरज नाही किंवा बाहेर पायपीट करत जात हॉटेल्स शोधण्याची गरज नाही. या बदलत्या जगात स्वतःच्या घरात बसून आपल्या आवडत्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो. त्यातच आता प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप Swiggy ने आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. या अंतर्गत तुम्हाला ३ महिने फ्री डिलिव्हरी आणि खाद्य पदार्थांवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Swiggy ची ग्राहकांसाठी खास ऑफर : Swiggy One Lite Membership

या फेस्टीव्ह सीजनमध्ये (Festive Season) Swiggy आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. Swiggy ने आपल्या ग्राहकांसाठी वन मेम्बरशिप (Swiggy One Lite Membership ) सुरु केली आहे. यासाठी तुम्हाला केवळ 99 रुपये खर्च करावे लागतील आणि मग यात मिळणाऱ्या अनेक सुविधांचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. हि मेंबरशिप जर का तुम्ही घेतलीत तर ३ महिन्यांसाठी मागवलेल्या ऑर्डरवर तुम्हाला मोफत डिलिवरी दिली जाईल. स्वीगीकडून ग्राहकांना 10 मोफत फूड डिलिवरी केल्या जातील.

या तीन महिन्यांमध्ये जर का तुम्ही खाद्य पदार्थांवर 144 रुपयांपेक्षा जास्ती पैसे खर्च केलेत तर 10 डीलीवारीज तुम्हाला मोफत दिल्या जातील.199 रुपयांपेक्षा जास्ती इंस्टामर्ट ऑर्डर्सवर (Instamart Orders) 10 मोफत डीलीवारीजची सोय उपलब्ध आहे. हि ऑफर इथेच संपत नाही, ग्राहकांना इथे 20,000 पेक्षा जास्ती हॉटेल्समध्ये नियमित ऑफर वगळता 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सुट मिळवण्याची हि सुवर्णसंधी आहे आणि 60 रुपयांपेक्षा जास्ती किमतीच्या डिलिवरीवर 10 टक्क्यांची सूट देखील मिळणार आहे.

ऑनलाईन डिलिवरीचा सगळीकडे वापर:

या ऑनलाईन खाद्य पदार्थंचा वापर जवळजवळ सगळीकडेच केला जात आहे. शहरातील कानाकोपऱ्यात या सुविधा पोहोचलेल्या आहेत. घरच्या गृहिणीपासून मुलांपर्यंत सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सोयीस्करअसा हा एक मार्ग बनला आहे. फक्त एका फोन कॉलवर घरपोच मिळणारी हि सुविधा सगळ्यांच्याच पसंतीत उतरत आहे. आता हा फेस्टीव सीजनमध्ये इथे ग्राहकांची मागणी नक्कीच वाढणार आहे त्यामुळे कंपनीला होणारा फायदा सुद्धा जबरदस्त असेल हे नक्की.