T+0 Trade: शेअर बाजारातील महत्वाची बातमी; T+0 Trade Settlement ची यादी जाहीर

T+0 Trade: आज शेअर बाजारात झालेल्या महत्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे T+0 Trade ची घोषणा. आज BSE ने उद्यापासून सुरु होणाऱ्या T+0 सेटलमेंट सायकलसाठी निवडल्या गेलेल्या शेअर्सची यादी प्रस्तुत केली आहे. तुमच्या माहितीत असलेल्या कंपन्यांपैकी अंबुजा सिमेंट्स, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा आणि BPCL यांचा सदर यादीत समावेश होतो.

T+0 Trade काय आहे?

T+0 म्हणजेच “T (Today) + 0 (Day)”. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही सकाळी शेअर्स विकत घेता आणि त्याच दिवशी त्यांची पेमेंट करून टाकता येते. त्याचप्रमाणे शेअर्सची विक्री केल्यावर त्वरित तुमच्या खात्यात पैसे येतात. T+0 ट्रेडिंगमुळे शेअर बाजारात रोख (Cash) स्वरुपाची देवाणघेवाण होते. शेअर बाजारात साधारणपणे तुम्ही आज विकत घेतलेले शेअर्स दोन दिवसांनी (T+2) तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतात आणि विकलेले शेअर्सची पेमेंटही दोन दिवसांनी मिळते(T+0 Trade). पण काही वेळा तुम्हाला तात्कालीन पैशांची गरज भासू शकते किंवा एखाद्या संधीचा फायदा लगेच घ्यायचा असतो, अशावेळी T+0 ट्रेडिंग तुमच्या कामी येऊ शकते.

T+0 Trade मध्ये सामावलेल्या कंपन्या कोणत्या?

  • 1. Ambuja Cements Ltd.
  • 2. Ashok Leyland Ltd.
  • 3. Bajaj Auto Ltd.
  • 4. Bank of Baroda
  • 5. Bharat Petroleum Corporation Ltd
  • 6. Birlasoft Ltd
  • 7. Cipla Ltd.
  • 8. Coforge Ltd
  • 9. Divis Laboratories Ltd.
  • 10. Hindalco Industries Ltd.
  • 11. Indian Hotels Co. Ltd.
  • 12. JSW Steel Ltd.
  • 13. LIC Housing Finance Ltd.
  • 14. LTI Mindtree Ltd
  • 15. MRF Ltd.
  • 16. Nestle India Ltd.
  • 17. NMDC Ltd.
  • 18. Oil and Natural Gas Corporation
  • 19. Petronet LNG Ltd.
  • 20. Samvardhana Motherson International Ltd
  • 21. State Bank of India
  • 22. Tata Communications Ltd.
  • 23. Trent Ltd.
  • 24. Union Bank of India
  • 25. Vedanta Ltd