T20 World Cup 2024: अमेरिकेत क्रिकेटचे महायुद्ध! भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी धावपळ सुरु

T20 World Cup 2024: क्रिकेट चाहत्यांनो तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्वाची आहे. T20 विश्वचषकाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहतोय आणि पैकी भारताचा पाकिस्तानशी होणारा धमाकेदार सामना जवळ येत आहे आणि नेहमीप्रमाणे या रणसंग्रामाची चर्चा आताच सुरू झाली आहे. जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स (US) मध्ये होणाऱ्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली आहे आणि सर्वांच्या नजरा न्यूयॉर्क येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर खिळल्या आहेत. या सामन्यासाठी तिकिटांची मागणी प्रचंड वाढली असून, ICC ला तिकिट वाटपांसाठी 200 पेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब केल्याची नोंद झाली आहे.

सर्वत्र वाहतंय भारत- पाकिस्तानचं वारं: (T20 World Cup 2024)

परदेशी होणाऱ्या या Mega स्पर्धेच्या तिकिटांसाठी सार्वजनिक बॅलटद्वारे खिडकी खुली होती आणि ही खिडकी 7 फेब्रुवारी रोजी बंद झाली आणि उर्वरित तिकिटांची विक्री गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. हा सामना न्यूयॉर्कमधील Long Island वरील Nassau County International क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषकाचे CEO, ब्रेट जोन्स यांनी या स्पर्धेला मिळणाऱ्या जबरदस्त जनतेच्या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की “इथे इतकी उत्कटता आहे की त्याचे वर्णन करण्यासाठी तिकिटांच्या विक्रीसारखा दुसरा कोणताही डेटा नाही (T20 World Cup 2024). आम्ही लोकांच्या या प्रचंड पाठिंब्यामुळे खूप रोमांचित झालो आहोत. हे T20 विश्वचषक अमेरिकेत क्रिकेटचा चेहराच बदलून टाकणार आहे आणि या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.”