Taj Hotel Data Breach : ताज हॉटेलमधून ग्राहकांचा डेटा लिक; बदल्यात मागितली 5000 डॉलरची खंडणी

बिझनेसनामा ऑनलाईन : मुंबईमधलं ताज हॉटेल हे सर्वांच्या परिचयाचं… दर दिवशी लाखोंच्या संख्येत लोकं ताज हॉटेलला भेट देत असतात. एकार्थी या हॉटेलला मुंबई नगराची शान म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही, पण आता टाटा समूहाच्या मालकीच्या याच प्रसिध्द हॉटेलची माहिती लिक (Taj Hotel Data Breach) झाली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार डेटा लीकमध्ये सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख लोकांचा डेटा होता. IANS (Indo-Asian News Service) च्या माहितीनुसार या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी सुरु झाली आहे.

प्रसिद्ध ताज हॉटेलचा डेटा लिक: Taj Hotel Data Breach

मुंबईचे भूषण म्हणून मिरवणाऱ्या प्रसिद्ध ताज हॉटेलचा डेटा लिक झाला आहे. Dnacookies या नावाने ट्वीटरवर अकाऊंट असलेल्या या गुन्हेगाराने याबदल्यात एकुण 5,000 डॉलरची खंडणी मागितली आहे. हॉटेलच्या लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांचा डेटा, मेंबरशिप आयडी, मोबाईल नंबर आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश होता. त्यामुळे लवकरात लवकर पाऊले उचलून कारवाई कारण महत्वाचं आहे, अन्यथा या माहितीचा वापर करून आणखीन मोठा गुन्हा घडण्याची शक्यता आहे.

ताज हॉटेल(Taj Hotel) हे इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) या कंपनीतर्फे चालवले जाते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डेटा लिक (Taj Hotel Data Breach) केलेल्या माणसाकडे वर्ष 2014 ते 2020 या कालावधीतील डेटा आहे आणि त्याच्याकडून आतापर्यंत तो कुठेही वापरण्यात आलेला नाही. कंपनीने जराही वेळ न दवडता या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) प्रकरणाची चौकशी करत आहे.