SBI ची ATM फ्रेंचाईजी घ्या आणि महिन्याला 50 हजार कमवा

बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल नोकऱ्यांचे वांदे झाले असून हवी तशी नोकरी मिळेलच अशी गॅरेंटी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक तरुणांचा कल हा व्यवसायाकडे वळत आहे. बाहेर कोणत्याही शहरात जाऊन नोकरी करण्यापेक्षा घराशेजारीच किंवा जवळच्या अंतरावर कोणता तरी व्यवसाय सुरु करून तितकेच पैसे कमवावे असा विचार आजकालचे तरुण करत आहेत. जर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कोणत्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच्या एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला 50 हजार रुपयांची कमाई करू शकता. हा व्यवसाय म्हणजे SBI ची ATM फ्रेंचाईजी घेणे हा आहे. त्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया …

जर तुम्हाला SBI ची ATM फ्रेंचाईजी घ्यायची असेल तर सर्वात आधी एटीएम इंस्टॉलेशन कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. सर्व बँका त्यांचे एटीएम फ्रेंचाईजी देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट करतात. यामध्ये टाटा इंडिकॅश मुथूट एटीएम, इंडिया वन एटीएम या कंपन्यांचा सहभाग आहे. एसबीआय बँक टाटा इंडिकॅश या कंपनीसोबत एटीएम स्थापित करण्यासाठी करार करते. SBI एटीएम च्या फ्रॅंचाईजीसाठी तुम्हाला www.indicash.co.in या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागते.

यानंतर होम पेजवर जाऊन ATM Franchise या पर्यायावर क्लिक करावी लागेल. क्लिक केल्यानंतर, नवीन पेजवर सर्व तपशील मिळतील. तिथे तुम्हाला एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी एक फॉर्म मिळेल, तो भरून सबमिट करावा लागेल. या एटीएम फ्रँचायझीसाठी तुम्हाला कमीतकमी गुंतवणूक करावी लागते. टाटा इंडिकॅश ची एकूण किंमत 5 लाख रुपये आहे. यासाठी घेणाऱ्या फ्रेंचाईजला 3 लाख रुपये गुंतवावे लागतात. इंडिकॅश एटीएम फ्रँचायझी देण्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये घेतले जातात. आणि ते नंतर परत केले जातात.

काय आहेत अटी –

एटीएम फ्रँचायझीसाठी काही अटी सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे. त्यानुसार तर तुम्ही एटीएम साठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे 80 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे तसेच त्याच्या बाजूला 100 मीटर अंतरावर वेगवेगळ्या कंपन्यांचे एटीएम देखील असावे. ज्या ठिकाणी तुम्ही एटीएम बसवणार आहेत त्या ठिकाणी 24 तास वीज असणे आवश्यक आहे. या सोबतच व्ही- सॅट बसवण्यासाठी एक किलोवॅट वीज कनेक्शन तुमच्याकडे असायला हवे.

एटीएम फ्रँचायझीसाठी ही कागदपत्रे लागतात-

तुमच्या आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा वीज बिल बँक खाते आणि पासबुक असणे आवश्यक आहे. याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो, ई-मेल आयडी, वैध फोन नंबर तसेच तुमच्याकडे GST क्रमांक असणे आवश्यक आहे.

महिन्याला किती रुपये मिळू शकतात?

एटीएम फ्रेंचाईजी घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक रोग व्यवहारावर एटीएमच्या फ्रेंचाईजीला आठ रुपये दिल्या जातात. यासोबतच एटीएम मधून प्रत्येक नॉन कॅश व्यवहारावर देखील बँकेकडून दोन रुपये मिळतात. म्हणजेच जर तुम्ही बसवलेल्या एटीएम मशीन पर्यंत दिवसात तीनशे लोक पोहोचले आणि त्यापैकी 200 लोकांनी पैसे काढले आणि शंभर लोकांनी शिल्लक तपासली तर तुम्हाला 50 हजार रुपये महिन्याला मिळू शकतात.