Tanishq Jewellery । आपल्यापैकी अनेकजण दुकानात जाऊन सोन्या चांदीची खरेदी नक्कीच करतील. त्यामुळे विषयाला साजेशी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही तनिष्क (Tanishq Jewelers) या दागिन्यांच्या दुकानाचं नाव ऐकलाच असेल. अनेकदा टीव्हीवर किंवा मोबाईल आणि वर्तमान पत्राच्या जाहिरातींवर आपण यांचं नाव पाहिलेलं आहे. भारतात मौल्यवान दागिने बनवणारा हा पहिला ब्रेंड मानला जातो. मात्र अनेक भारतीयांची आज आवड बनलेल्या या तनिष्कला सुद्धा एकेकाळी कठीण प्रसंगांना समोरं जावं लागलं होतं, काय आहे गोष्ट पाहूयात…
टाटा समूहाचा ब्रँड : Tanishq Jewellery
तुम्ही कदाचित हे जाणून असाल कि तनिष्क हा टाटा टायटन समूहाचा ब्रँड आहे. आज 500 पेक्षा जास्ती दुकानं असलेल्या या ब्रँडची सुरुवात केवळ एक घड्याळ बनवणारी कंपनी म्हणून करण्यात आली होती. वर्ष 1984 मध्ये याचा पहिला कारखाना तामिळनाडू मध्ये उघडण्यात आला. आणि हळूहळू परदेशी प्रकारच्या ब्रँडनी प्रभावित होत तनिष्कने स्वतः दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला. इथेच भारतातील पहिल्या रिटेल दागिन्यांच्या दुकानाची सुरुवात झाली.
तनिष्क समोर होते अडथळे:
1996 मध्ये तमिळनाडू येथे पहिले दुकान उघडल्यानंतर त्यांनी 18 कॅरेट सोन्याची विक्री सुरु केली. त्याच बरोबर ते हिऱ्यांचा व्यापार सुद्धा करायचे. मात्र त्या काळात लोकं 22 कॅरेट सोन्याला भाव देत असल्यामुळे 18 कॅरेट सह तनिष्कला ग्राहकवर्ग मिळेना. हि बाब लक्षात घेऊन तनिष्क 22 केरट सोन्याचे दागिने तयार करू लागला पण तरीही म्हणेल तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. यावेळी टाटा समूहाकडून सुद्धा दागिन्यांचा व्यवसाय बंद पाडण्याचा दबाव कायम होता, मात्र इथे तनिष्कने शक्कल लढवली आणि तनिष्कने कॅरेटमीटर असे यंत्र भारतीय दागिन्यांच्या बाजारात आणले. यामध्ये एक्स-रेच्या मदतीने सोन्याची शुद्धता त्वरित तपासली जायची. कॅरेटमीटरची कल्पना एवढी जबरदस्त ठरली की त्यामुळे तनिष्कचे नशीबच बदलले (Tanishq Jewellery).
आज तनिष्क आहे सर्वोत्तम:
कधीकाळी ग्राहकवर्ग जमवण्यासाठी धडपड करणारा तनिष्क हा ब्रँड आज जगभरात प्रसिध्द आहे. हळूहळू आपला व्यवसाय वाढवण्यासाठी तनिष्कने फुकट दागिन्यांची शुद्धता तपश्ण्याची मोहीम सुरु केली आणि ग्राहक वर्गाचा विश्वास मिळवला, आता आपण पाहिलं तर या दुकानांच्या बाहेर रांगा लागलेल्या असतात. आज हा जगातील सर्व परिचित दागिन्यांचा ब्रँड आहे, आणि टायटनला यामुळे वेगळी ओळख मिळाली आहे.