52 Week High च्या दिशेने झेपावतोय Tata कंपनीचा ‘हा’ शेअर

बिझिनेसनामा : लॉकडाउन नंतर शेअर मार्केटबाबत सामान्य माणसांतील उत्सुकता अधिकच वाढली असून पूर्वी जुगार,सट्टा अश्या टोपण नावाने गणला जाणारा शेअर बाजार आता सन्मानाने पैसे कमावण्यासाठीचा एक मार्ग असल्याची खात्री सर्वसामान्याना पटली आहे. त्यामुळे अनेकजण एक कमाईचे क्षेत्र म्हणून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. आपला पैसा हा बँकेत FD स्वरूपात ठेवण्यापेक्षा तो जर योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने शेअर बाजारात गुंतवला तर त्यातून कमी कालावधीत खूप अधिक प्रमाणात परतावा मिळू शकतो हीच बाब लक्ष्यात घेऊन आता शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सध्या शेअर बाजारात टाटा कंपनी आपल्या “TATA TECHNOLOGIES” ह्या कंपनीचा आयपीओ बाजारात आणणार असल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने टाटा कंपनीच्या ” Tata motors ” ह्या शेअरमध्ये भयंकर तेजी पाहण्यास मिळाली २८ मार्च २०२३ रोजी ४०१ रुपयांवर असणारा हा शेअर आता चक्क ५१५ रुपयांवर येऊन ठेपला आहे . Tata motors शेअरची हि घोडदौड पाहता येत्या काही दिवसांतच हा शेअर ५२ आठवड्यांच्या आपल्या किंमतीचा उच्चांक मोडेल यांत शंकाच नाही.

काय होता टाटा कंपनीचा तिमाही निकाल?

गेल्या मार्च महिन्यात Tata motors कंपनीचे तिमाही निकाल जबरदस्त आल्यानंतर गुंतवणूकदारानी आपली पहिली पसंती हि Tata motors च्या शेअरला दिली असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळेच गेल्या दोन महिन्यातच tata कंपनीचा Tata motors हा शेअर रॉकेट बनून अगदी सुसाट पळत सुटला आहे ज्यायोगे त्यांच्या गुंतवणूकदारांना अगदी कमी वेळात आपल्या गुंवणूकीवर चक्क २५ टक्क्याहून अधिक नफा झाला आहे. २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च ) त्यांचा एकूण नफा हा ५४०८ कोटी इतका होता. याआधी गेल्यावर्षी ह्याच तिमाहीत कंपनीला १०३३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. Tata motors कंपनीच्या यंदाच्या तिमाही निकालानंतर त्यांची ऑपरेटिंग इन्कम हि २७,४९३ कोटी रुपयांनी वाढली आहे. गेल्यावर्षी २०२२ रोजी कंपनीची ऑपरेटिंग इन्कम ७८,४३९ कोटी रुपये इतकी होती तर यंदा ती १,०५९३२ कोटी इतके रुपये नोंदवण्यात आली होती .

TATA TECHNOLOGIES IPO

९ मार्च २०२३ रोजी TATA TECHNOLOGIES सेबी डे आयपीओ ची रक्कम जमा केली होती . तसेच Tata motors ने TATA TECHNOLOGIES शेअर मध्ये एकूण ७४.६९ टक्के आपली भागीदारी कायम ठेवत येत्या काळात हि कंपनी आयपीओ च्या माध्यमातून सुमारे ९. ५७१ कोटी शेअर बाजारात विक्रीस उपलब्ध करणार आहे . आपल्या तिमाही निकालाच्या आणि IPO च्या बातमीने सध्या सुसाट धावणारा Tata motors शेअर आपल्या ५२ आठवड्यातील किंमतीचे उच्चांक मोडून विक्रमी ५९० किंमती पर्यंत झेपावेल असा अंदाज वर्तवला आहे.