Tata Consultancy Services : TCS ला महाराष्ट्र सरकारची नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

बिझनेसनामा ऑनलाईन । Tata समूहासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकारकडून TCS कंपनीला (Tata Consultancy Services) एक नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पाठवलेल्या या नोटीसमधून TCS च्या व्यवस्थापनाला 2 नोव्हेंबर रोजी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे, आज जाणून घेऊया नेमका काय आहे हा विषय ज्यामुळे कंपनीला राज्य सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली आहे…

TCS ला नोटीस का जारी केली ? (Tata Consultancy Services)

महाराष्ट्र राज्य सरकारकडून TCS कंपनीविरुद्ध एक नोटीस जारी करण्यात आली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी 200 कर्मचाऱ्यांची निवड केली होती मात्र अद्याप त्यांच्या नियुक्तीबद्दल कोणतीही प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांच्या म्हणण्याप्रमाणे कंपनीत नोकरीसाठी रुजू होण्यास उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या आता 2,000 झाली आहे. हे लोकं सध्या पूर्णपणे बेरोजगार आहेत आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.

या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा अशी नोटीस NITES कडून जारी करण्यात आली आहे. कंपनीकडून (Tata Consultancy Services) कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला उशीर होत असल्यामुळे यात त्यांची काहीही चूक नाही, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या पगारात कोणतीही कपात न करण्याची नोटीस तयार करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी बेंगळुरू, पुणे, कोची, भुवनेश्वर, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांचा भाग आहेत व त्यांची नियुक्ती याच वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात झाली होती. मार त्यांना रुजू करून घेण्यात एक महिना उशीर झाला आहे.