Tata Consumer Deal : रतन टाटांनी पक्का केलाय मोठा सौदा; 7 हजार कोटींमध्ये खरेदी करणार ‘या’ दोन कंपन्या

Tata Consumer Deal : आपल्या देशातील Tata Consultancy ही सर्वात जुनी कंपनी आहे व रतन टाटा हे अनुभवी उद्योजक आहेत. कंपनीचा विकास करण्यासाठी नेहमीच मालकांकडून वेगवेगळ्या गुंतवणुका केल्या जातात, त्याप्रमाणे रतन टाटांनी देखील आता दोन मोठ्या कंपन्या विकत घेण्याचा निर्णय घेतलाय. Tata Consultancy Services च्या अंतर्गत येणाऱ्या Tata Consumer या कंपनीने Capital Foods आणि Fab India या दोन कंपन्यांसोबत करार पूर्ण केला आहे. Tata Consumer Limited या कंपनीला आपला व्यवसाय आणखी मजबूत करायचा असल्याने त्यांनी या दोन्ही कंपन्यांशी हात मिळवणी करण्याचा करार मंजूर केला आहे. बाजारातील हा करार पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांची जबाबदारी टाटा समूहाच्या खांद्यांवर येईल.

किती कोटींना विकत घेतल्या दोन्ही कंपन्या: (Tata Consumer Deal)

Tata Consumer ने दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच चिंच सिक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स या नामांकित ब्रॅण्ड्सचे मालक असलेल्या Capital Foods या कंपनीला 5 हजार 100 कोटी रुपयांमध्ये विकत घेणार आहेत, यानंतर टाटा कंपनीच्या मालकीखाली येणारी Tata Consumer ही कंपनी करारबद्ध कंपनीचे 100 टक्के स्टेक खरेदी करेल. आपल्या देशात Fab India ही एक परिचित कंपनी म्हणून ओळखली जाते, यांच्या अंतर्गत ऑरगॅनिक चहा, हर्बल उत्पादन आणि आरोग्याशी संबंधित उत्पादनांची विक्री केली जाते. टाटा कंपनीसह करार झाल्याने आता लवकरच टाटा समूह Fab India ला 1 हजार 900 कोटी रुपयांमध्ये विकत घेणार आहे.

व्यवसायातील वाढती मागणी बघता आणि व्यवसायाला एक नवीन दर्जा देण्याकरता टाटा कंपनीने Capital Foods चे अधिक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे. Tata Consumer ने दिलेल्या माहितीनुसार Capital Foods ची आर्थिक वर्ष 2024 ची एकूण उलाढाल 750 ते 770 कोटी रुपयांची होती, तर Fab India ने जवळपास 360 ते 370 कोटी रुपयांचा व्यवहार केलेला आहे (Tata Consumer Deal). Capital Foods चे संस्थापक अजय गुप्ता हे टाटा समूहासोबत करार करण्यास अत्यंत उत्सुक आहेत. एवढंच नाही तर ते या कराराच्या दिवसाला एक ऐतिहासिक दिवस म्हणून संबोधतात. दुसरी कंपनी म्हणजे Fab India याचे MD विल्यम बिसेल हे देखील टाटा समूहासोबत करार करण्यास उत्सुक आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात कार्यरत असलेल्या कंपनीशी व्यावहारिक संबंध प्रस्थापित करणे हे आमच्यासाठी भाग्यच आहे असे ते म्हणतात.