Tata E-Car Price: टाटा आणि MG मोटरच्या इलेक्ट्रिक कार स्वस्त; ग्राहकांना आनंदाची बातमी

Tata E-Car Price: वाहनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. टाटा मोटर्स आणि MG Motors या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीमध्ये 1.2 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. टाटा मोटर्सने Nexon.ev आणि Tiago.ev तर MG Motorsने ZS EV या मॉडेल्ससाठी नवीन आणि कमी किंमती जाहीर केल्या आहेत.

टाटाच्या इलेकट्रीक गाड्यांच्या किमती घटल्या:

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने Nexon.ev च्या किमतीत 1.2 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. आता त्याची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होईल. Tiago.ev च्या किंमतीत 70,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याच्या बेस मॉडलची किंमत आता 7.99 लाख रुपयांपासून सुरू होईल.

किमती घटण्याचे कारण काय? (Tata E-Car Price)

टाटा पैसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEM) के मुख्य कर्मशल ऑफिसर विवेक श्रीवत्स यांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांची (EV) किंमत कमी करण्यामागे अनेक कारणे आहेत.

मुख्य कारण म्हणजे बॅटरीची कमी होणारी किंमत. बॅटरी ही इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात महाग घटक असते आणि त्याची किंमत कमी झाल्यामुळे वाहनाची एकूण किंमतही कमी होते. श्रीवत्स यांनी सांगितले की, “बॅटरी सेलच्या किंमतीत नुकतीच घसरण झालीये आणि भविष्यातही ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आम्ही याचा फायदा थेट ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.”

MG Motors ने घटवल्या किंमती:

MG मोटर्सने आपल्या लोकप्रिय E-Vehicle, कॉमेट मिनी इलेक्ट्रिक आणि JDS Green SUV यांच्या किंमतीत कपात केली आहे (Tata E-Car Price). कॉमेट मिनी इलेक्ट्रिक कार आता 1 लाख रुपये कमी किंमतीत, म्हणजेच 7 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर JDS Green SUV ची नवीन बेस व्हेरिएंटची किंमत 19 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी या SUV ची सुरुवातीची किंमत 22 लाख रुपये होती.