Tata Group च्या ‘या’ कंपनीची मोठी घोषणा!! प्रतिशेअर 60 रुपयांचा Dividend देणार

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टाटा समूहाच्या Tata Elxsi Ltd या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 60 रुपये डिविडेंड देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या डिविडेंडची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. तत्पूर्वी या शेअर्स मध्ये गुंतवणूक करून डिवीडेंट मिळवण्याचा लाभ घेऊ शकता.

कंपनीने एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर शेअर धारकांना 606 टक्के डिविडेंड दिला जाईल. या डिविडेंड साठी 22 जून 2023 हि रेकॉर्ड देत निश्चित करण्यात आली आहे. कंपनी त्याच दिवशी शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंडचा व्यवहारही करेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या तारखेपूर्वी शेअर्स खरेदी केले आणि रेकॉर्ड डेटनंतर ते त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले, तर त्याला डिवीडेंटचा हक्क मिळणार आहे. Tata Elxsi च्या पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 60.60 रुपये डिविडेंड देण्यात येणार आहे.

Tata Elxsi च्या सध्याच्या शेअरची किंमत 7614.55 रुपये आहे. Tata Elxsi च्या स्टॉकने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 470 टक्के बंपर रिटर्न दिला आहे. तर गेल्या महिनाभरातही या शेअर्समध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात Tata Elxsi च्या स्टॉकमध्ये ८.८५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 10,760 रुपये प्रति शेअर आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 5709.05 रुपये प्रति शेअर आहे.