Tata Group : भारतातील लाखो आणि करोडो जनतेचे स्वप्न येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे, कारण अयोध्येत अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर पुन्हा एकदा श्रीराम आपल्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत. या प्रतिष्ठित सोहळ्याला अनेक दिग्गज हजेरी लावतील. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात टाटा ग्रुप्स या समूहाचे महत्त्वाचे योगदान आहे. टाटा ग्रुप्स देशातील एक नावाजलेली कंपनी आहे, जिचा विस्तार अगदी स्वयंपाकघरापासून ते थेट विमानसेवेपर्यंत पसरलेला दिसतो. अलीकडच्या काळात टाटा ग्रुप्सकडे आलेल्या सर्वात मोठ्या उपक्रमांमध्ये संसद भवनाची निर्मिती आणि आता होऊ घातलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टाटा प्रोजेक्ट्सला या निर्मितीसाठी सन्मानित देखील करण्यात आले आहे.
राममंदीर निर्मितीत टाटा समूहाचा मोलाचा वाटा: (Tata Group)
देशातील करोडो लोकांना ज्या दिवसाची आस लागून राहिली होती तो दिवस 22 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्षात उतरणार आहे. अनेक वर्षे कित्येक चढउतारांना तोंड देत राममंदिराने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. केवळ अयोध्येतच नाही तर देशभरातून कैक संख्येत लोकं श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या कामात रुजू झाले आहेत आणि या कामगिरीत टाटा समूह (Tata Group) सुद्धा मागे नाही. मंदिराच्या निर्माणाची जबाबदारी लार्सन अँड टुर्बो यांच्याकडे सोपवण्यात आली होती आणि टाटा कंस्ट्रक्शन्स यांच्यावर बांधकामाच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली गेली होती. टाटा कंपनी मंदिराच्या प्रबंधनाचे काम सुद्धा करत आहे.
अयोध्येत चालेल्या मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी समूहावर सोपवण्यात आलेली काही पहिली जबाबदरी नाही, तर या अगोदर देखील टाटा समूहावर (Tata Group) देशाच्या नवीन संसद भवनाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. एकूण 861.90 कोटी रुपयांची विजयी बोली लावून कंपनीने या प्रोजेक्टची जबाबदारी स्वीकारली होती. 2023 च्या सप्टेंबर महिन्यात संसद भवनाचे बांधकाम पूर्ण होऊन एकूण खर्च 1200 कोटी रुपयांच्या घरात गेल्याच्या चर्चा बाजारात सुरु आहेत.
असा आहे टाटा समूहाचा एकंदरीत कारभार:
आज एक भव्य-दिव्य व्यवसाय म्हणून जगभरात नाव गाजवत असलेल्या टाटा समूहाची सुरुवात जमशेद टाटा यांनी वर्ष 1907 मध्ये केली होती, तर समूहाकडून वर्ष 1912 इंडिया सिमेंट या कंपनीची सुरुवात करण्यात आली होती, तसेच पहिल्या इंडस्ट्रियल बँकची सुरुवात देखील टाटा समूहाकडून वर्ष 1917 मध्ये करण्यात आली. टाटा समूहाची पकड केवळ एका क्षेत्रात नाही तर विविध क्षेत्रांमध्ये मजबूत आहे, ज्यात विमानसेवेचाही समावेश होतो. सध्या एअर इंडिया हि प्रसिद्ध विमान सेवा जरी समूहाच्या अंर्गत सुरु असली तरीही या अगोदर कंपनीने 1962 मध्ये टाटा एरलाईन्सच्या नावाने या कंपनीची सुरुवात केली होती. टाटा हॉटेल्स मध्ये मुंबईमधील प्रसिद्ध ताजचाही समावेश होतो विसरून चालणार नाही.