Tata Group IPO । आत्तापर्यंत देशातील सर्वात मोठा IOP हा LIC या विमा कंपनीच्या नावे होती, मात्र आता लवकरच LIC कडून हा किताब काढून घेतला जाणार आहे. कारण देशातील सर्वात प्रसिद्ध कंपनी असलेला टाटा ग्रुप्स ( Tata Groups) लवकरच देशातील सर्वात मोठा IPO बाजारात आणणार आहे. जवळजवळ 19 वर्षांनंतर हि कंपनी IPOच्या बाजारात पुन्हा प्रवेश करणार आहे, त्यांच्या हालचाली पाहता येणाऱ्या दिवसांत टाटा ग्रुपकडे देशातील सर्वात मोठ्या IOP चा किताब जाऊ शकतो.
टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO आणणार आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, सेबीने टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च करण्यास मान्यता सुद्धा दिली आहे. त्याच दरम्यान, टाटा ग्रुप आणखी एक IPO बाजारात आणण्याचा (Tata Group IPO) प्लॅन करत आहे. टाटा समूह आपली होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा IPO लॉन्च करू शकतो.
कधी येणार टाटा सन्सचा IPO –
टाटा सन्सला सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होण्यासारखे पर्याय पहावे लागतील. 14 सप्टेंबर 2023 रोजी RBI ने 15 NBFC ची यादी जारी केली,. या यादीत ज्यामध्ये टाटा सन्सचे नाव आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत, कंपनीला बाजारात लिस्टेड करणे आणि यासाठी टाटा सन्सला त्याचा IPO लॉन्च करणे गरजेचे आहे.
देशातील सर्वात मोठा IPO – Tata Group IPO
टाटा सन्सचे सध्याचे मूल्यांकन अंदाजे 11 लाख कोटी रुपये आहे. IPO लाँच केल्यानंतर, कंपनीला टाटा ट्रस्ट आणि इतर शेअर्स होल्डरसह सुमारे 5 टक्के हिस्सा कमी करावा लागेल आणि या आधारावर, टाटा सन्सच्या IPO च्या इश्यूचा आकार सुमारे 55,000 कोटी रुपये असू शकतो. यामुळे टाटा कंपनीचा IPO देशातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. यापूर्वी भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC ने सर्वाधिक 21,000 कोटी रुपयांचा IPOलॉन्च केला होता.