Tata Group IPO: गुंतवणूकदारांसाठी ही बातमी फारच महत्वाची ठरते कारण टाटा समूहाकडून लवकरच IPO बद्दलची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. वर्ष 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात आलेल्या IPO ला गुंतवणूकदारांनीं भरगोस प्रतिसाद दिला होता त्यानंतर आता पुन्हा समूह एक नवीन IPO आणण्याच्या तयारीत आहे.
टाटा समूह नवीन IPO च्या तयारीत? (Tata Group IPO)
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार टाटा समूह येणाऱ्या दोन ते तीन वर्षात नवीन IPO आणण्याच्या तयारीत आहे. भविष्यात चलनवाढ व्हावी आणि काही निवडक गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून कंपनीने हा निर्णय घेल्याचे सांगितले जाते. समूहाकडून मिलेल्या माहितीनुसार IPO च्या यादीत टाटा कॅपिटल, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, बिगबास्केट, टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा हाउसिंग आणि टाटा बॅटरीज यांचा समावेश होतो.
लक्ष्यात घ्या टाटा समूह हा बाजाराचा एक महत्वाचा भाग आहे, कारण टाटा समूह हा बऱ्यापैकी जुना आणि अनुभवी व्यवसाय म्हणून ओळखला जातो. आत्ताच्या घडीला टाटा हि आपल्या देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी तसेच शेअर बाजारात देखील त्यांचा दुसरा क्रमांक लागतो(Tata Group IPO). समूहाकडून आलेल्या IPO च्या माहितीनंतर शेअर बाजारात त्यांची चर्चा वाढत चालली आहे, आणि कंपनीचे शेअर्स देखील वधारले आहेत. सध्या कंपनीचे एकूण market cap 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एवढा मोठा आकडा असणारा हा भारतातील पहिला व्यावसायिक समूह आहे.