Tata Group: टाटा समूह हा भारतातील एक नावाजलेला आणि जुना व्यवसाय आहे. टाटा समूह नेहमीच आपल्या अनुभवनाच्या आधारे यश संपादन करीत असतो आणि आता 30 लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्याच्या टप्प्याला पार करणारा हा देशातील पहिला समूह बनला आहे. 6 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा समूहाची बाजारपेठेतील एकूण किंमत (Market Cap) 30.4 लाख करोड रुपयांवर पोहोचले होते. टाटा समूहाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला रिलायन्स समूह 21.6 लाख कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला अदानी समूह 15.6 लाख कोटी रुपयांवर पाहायला मिळतो.
टाटा समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांची स्थती:
टाटा समूहात 25 सूचीबद्ध कंपन्या आहेत. यातील 5 कंपन्यांचा बाजारातील एकूण मार्केट कॅपमध्ये 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. टाटा समूहातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणजे TCS, ज्याचे मार्केट कॅप 15.1 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज नंतर हीच भारतातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी म्हणावी लागेल.
टाटा समूहात TCS नंतर टाटा मोटर्स दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी आहे, कारण तिचं बाजार मूल्य 3.4 लाख कोटी रुपये आहे. टाटा समूहात बाजार मूल्याच्या आधारावर टायटन तिसऱ्या क्रमांकावर आहे, तिचं बाजार मूल्य 3.2 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टील 1.8 लाख कोटी रुपये आणि टाटा पॉवर 1.3 लाख कोटी रुपये बाजार मूल्यासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या वर्षी समूहाची IT कंपनी TCSचं बाजार मूल्य 1.2 लाख कोटी रुपायांनी वाढलं असून, समूहाच्या (Tata Group) मूल्यांकनात झालेल्या वाढीमध्ये TCSचा 60 टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये यंदा 19 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.