Tata Groups लवकरच विकणार ‘ही’ कंपनी; भरगोस नफा मिळवत असताना हा निर्णय का?

Tata Groups : बाजारात अनेक कंपन्यांची खरेदी विक्री सुरु असते, आणि आता याट भर पडलीये ती देशातील सुप्रसिद्ध कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसीसची. टाटा समूह येणाऱ्या काही काळात होल्टास लिमिटेड (Voltas Limited) हीआपली एक उपकंपनी विकणार असल्याची बातमी आज समोर आली आहे. कंपनी विकण्याचे एकच कारण म्हणजे व्यवसायाचा विस्तार आहे अशी माहिती टाटा समूहाकडू देण्यात आली आहे, आज जाणून घेऊया या विषयाबद्दल थोडक्यात पण गरजेचं सारं काही..

व्यवसाय विस्तार करण्यासाठी आता टाटा समूह (Tata Groups) आपल्या एका कंपनीची विक्री करणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र अद्याप हि प्रक्रिया पहिल्याच टप्प्यांत असून कदाचित कंपनीकडून हा निर्णय बदलला जाऊ शकतो. पण याबद्दल कंपनीच्या प्रतिनिधीने माहिती दिलेली नाही. त्यामुळे या कंपनीची खरोखर विक्री होणार आहे कि नाही यावर अध्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

70 वर्ष जुनी कंपनी – Tata Groups

वर्ष 1954 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती, आणि तेव्हापासून ते एअर कंडीशनर, वोटर कुलर आणि घरगुती उपकरणांची विक्री करत आहे. हा व्यवसाय आपल्याला भारता व्यतिरिक्त मध्य आणि दक्षिण पूर्व आशियात आणि आफ्रिकेत पाहायला मिळतो. कंपनीचे एकूण भांडवल पाहायला गेलो तर हा आकडा 3.3 अब्ज डॉलर्स वर पोहोचलेला आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळते. आता एवढा नफा कमावणारी कंपनी नेमकी कोणाला विकली जाणार हे पाहणं रंज्यक ठरणार आहे आणि याबद्दल जर का कोणी खरी माहिती देऊ शकणार असेल तर तो केवळ टाटा समूह आहे.