Tata Groups Lakshadweep Plan : टाटा ग्रुपचा मोठा प्लॅन; लक्षद्वीपमध्ये सुरु करणार ‘हा’ व्यवसाय

Tata Groups Lakshadweep Plan : सध्या मालदीववर भारताकडून जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. मालदीव इथल्या काही मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या टिप्पणीमुळे भारतीय संतापले असून त्यांनी #BoycottMaldives असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू केला. भारतातील अनेक टुरिझम कंपन्यांनी या अभियानात नेटकऱ्यांची साथ दिली आणि म्हणूनच पर्यटनाद्वारे अधिकाधिक कमाई करणाऱ्या मालदीवला त्वरित आपल्या तीन मंत्र्यांना पदावरून हटवावे लागले आहे. नेटकऱ्यांच्या याच ट्रेंडमुळे मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कटली आहे. मात्र नेटकऱ्यांनी आता चलो लक्षद्वीप (#ChaloLakshadweep) असा नवीन ट्रेंड सुरु केला असून यामुळ अनेकांच्या नजरा या लक्षद्वीपकडे वळत आहेत. यात आता टाटा ग्रुपने सुद्धा उडी घेतली आहे.

अलीकडेच देशाच्या पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देऊन तिथले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर झालेल्या संपूर्ण प्रकारामुळे केवळ मालदीवच नाही तर लक्षद्वीप सुद्धा चर्चेचा विषय बनला. पंतप्रधानांनी देशवासीयांना आयुष्यात एकदा तरी लक्षद्वीपला जरूर भेट द्या असं आवाहन केलं होतं. संपूर्ण प्रकारानंतर जरी मालदीवची अर्थव्यवस्था धोक्यात आली असली तरीही लक्षद्वीप मात्र अधिकाधिक कमाई करण्याच्या मार्गावर आहे. लवकरच मोठमोठ्या कंपन्या या लक्षद्वीपच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, यामधील टाटा ग्रुप्स हे सर्वात महत्त्वाचं नाव आहे. वर्ष 2026 पर्यंत टाटा ग्रुप यांना लक्षद्वीपवर खास व्यवसायाची उभारणी करायची आहे.

Boycott Maldives नंतर, आता नेटकरी म्हणतायेत Chalo Lakshadweep!!:

भारत आणि मालदीव यांच्यात सुरू झालेल्या या वादविवादानंतर आता नेटकऱ्यांचे चलो लक्षद्वीप हे अभियान अनेकांच्या नजरा आकर्षित करत आहेत. बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड यशस्वी झाल्यानंतर आता नेटकरांनी चलो लक्षद्वीप या नवीन ट्रेंडची सुरुवात केली आहे. मेक माय ट्रिपने (Make My Trip) शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यापासून हे ठिकाण आणि याबद्दलच्या शोध प्रक्रियेमध्ये 3400 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लक्षद्वीप 2026 टाटा ग्रुपचा हा मेगा प्लॅन: (Tata Groups Lakshadweep Plan)

नेटकऱ्यांच्या जोशामुळे सध्या लक्षद्वीप हे ठिकाण पर्यटन स्थळांच्या यादीत सर्वात अधिक लोकांना आपल्याजवळ आकर्षित करत आहे. लक्षद्वीपला मिळालेले हीच पसंती लक्षात घेता, भारतातील काही कंपन्या या बेटावर जाऊन व्यवसाय सुरू (Tata Groups Lakshadweep Plan) करण्याच्या तयारीत आहेत. भारतातील सुप्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा हे सुद्धा वर्ष 2026 पर्यंत लक्षद्वीपवर दोन लक्झरी रिसॉर्ट सुरू करण्याच्या विचारात आहेत. लक्षद्वीपच्या सुहेली आणि कदमत या बेटांवर टाटा ग्रुप कडून या रिसॉर्टची सुरुवात केली जाईल.

लक्षद्वीपवर एकूण 36 बेटांचा समावेश होतो. ज्या मधील बंगाराम, अगत्ती, कदमत, मिनीकॉय, करवत्ती आणि सुहेली हे काही प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत. यांपैकी कदमत हा प्रसिद्ध Dive Center म्हणून ओळखला जातो. टाटा ग्रुपच्या अंतर्गत इंडियन हॉटेल्स कंपनी कडून सुहेली येथे बनवणाऱ्या रिसॉर्टमध्ये एकूण 110 खोल्या असतील. यांमध्ये 60 वीला आणि पन्नास वॉटर विला तयार केले जातील. एवढेच नाही तर कदमत येथे 75 बीच साइड विला आणि 35 वॉटर विला यांची उभारणी केले जाईल.

लक्षद्वीप हा चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्यामुळे येथे स्कुबा डायव्हिंग,स्नॉर्केलिंग, सर्फिंग, वॉटर स्कीइंग आणि राफ्टिंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. लक्षद्वीप हे बेट काही अंशी प्रसिद्ध होतेच, मात्र सोशल मीडियावर चालेल्या ट्रेंडमुळे नक्कीच देश विदेशातून अनेकांच्या नजरा आता लक्षद्वीपकडे वळत आहेत. सध्या मालदीवची अर्थव्यवस्था धोक्यात असली तरीही भारतासाठी अधिकाधिक कमाई करण्याची साधने आता लक्षद्वीपवरूनही सुरु होतील.