Tata Iphone : Tata चा मोठा प्लॅन, iPhone निर्मितीचा वेग दुप्पट; 28 हजार लोकांना मिळणार रोजगार

Tata Iphone : आपल्याकडे हातात iPhone असलेल्या माणसाची एक वेगळीच जादू असते, iPhone घेऊन वावणारा माणूस अपोआप लोकांच्या नजरेत येतो आणि लोकं त्याला सन्मानाने बघू लागतात. खिश्यात पैसे असो वा नसो हातात iPhone असलेला माणूस श्रीमंत म्हणून ओळखला जातो. आजूबाजूला वाढलेली हि क्रेझ पाहून आपल्यालाही जवळ एखादा iPhone असावा अशी इच्छा होणं स्वाभाविक आहे. या बोलाबालात टाटा समूहाने बाजारात iPhoneची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.

टाटा कंपनी बनवणार iPhone- Tata Iphone

बाजारात वाढणारी iPhoneची क्रेज अनेकांना भुरळ घालत आहे. अश्या टाटा समूह आता भारतात iPhone तयार करणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या नवीन निर्णयाबाबत टाटाचे एकमेव उदिष्ट म्हणजे भारतात iPhone निर्मितीचा वेग (Tata Iphone) दुप्पट करणे हाच आहे. देशात iPhoneच्या निर्मातीबदल समूह अग्रेसर आहे म्हणूनच त्यांनी विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 125 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले आहे. तसेच टाटा समूहाचा हा जबरदस्त प्लॅन देशात सुमारे 28,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.

टाटा समूहने या युनिटमध्ये एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना रोजगार देण्याची योजना बनवत आहेत. माध्यमांच्या रिपोर्टनुसार टाटा समूहाने या व्यवसायासाठी विस्ट्रॉनच्या मालकीचा कारखाना ताब्यात घेतला आहे.

विस्ट्रॉन विकणार टाटा समूहाला कंपनी:

गेल्या अनेक वर्षांपासून विस्ट्रॉन आपला व्यवसाय विकण्याच्या तयारीत होती. कारण Apple ने लाद्लेलेल्या अटींमुळे कंपनी संकटांचा सामना करत होती, अहवाल सांगतात कि विस्ट्रॉनला कंपनीच्या लहान आकारामुळे आणि व्यवस्थापनातील समस्यांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता, या बरोबरच चीन आणि भारतात संसृतिक फरकांमुळे कामगारांना इथे काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे विस्ट्रॉन कंपनीने आपली Iphone Assembly सुविधा टाटा समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या टाटा समूह भारतात आगामी iPhone 15 मॉडेलच्या Assembly ची चाचणी करत आहे.