Tata IPO: गुंतवणूकदारांसाठी खास संधी; टाटा समूहाची कंपनी आणणार IPO

Tata IPO: टाटा समूह, देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे, लवकरच आपला दुसरा IPO घेऊन येणार आहे. गेल्या वर्षी Tata Technologies च्या यशस्वी IPO नंतर, टाटा समूह आता आपल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) व्यवसायासाठी पैसे उभारण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहे.

टाटा समूह आणणार IPO: (Tata IPO)

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) लवकरच बाजारात येण्यासाठी तयार आहे. कंपनी पुढील 12 ते 18 महिन्यांत आपला IPO आणू शकते, या माध्यमातून कंपनी 1 ते 2 अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आखत आहे.

TPEML ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी असून वर्ष 2021 मध्ये स्थापन झालेली ही टाटा समूहाची सर्वात नवीन कंपनी आहे. TPEML ही मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक स्वीकारणारी टाटा समूहातील पहिली कंपनी आहे, जी Nexon EV आणि Tiago EV सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार बनवते.

कंपनीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 1 अब्ज (सुमारे 7,500 कोटी) निधी उभारला होता, ज्यामध्ये अमेरिकेतील TPG या प्रायव्हेट इक्विटी फंडने सर्वाधिक गुंतवणूक केली होती. TPEMLची योजना वर्ष 2026 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये 2 अब्ज (सुमारे 15,000 कोटी) गुंतवणुक उभारण्याची आहे. टाटा समूहाने IPO साठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु यासाठी 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.