Tata Motors: टाटा मोटर्सच्या शेअर्सची विक्रमी झेप; डीमर्जरच्या घोषणेवर काय म्हणतात तज्ञ?

Tata Motors: टाटा मोटर्सच्या शेअर्सने आज मंगळवारी विक्रमी उच्चांक गाठला आहे. कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करण्याची योजना जाहीर केल्यानंतर ही वाढ झाली असे वृत्त समोर आले आहे. या डिमर्जर योजनेनुसार, टाटा मोटर्स दोन भागांमध्ये विभागली जाईल – एक Commercial Vehicle (CV) साठी आणि दुसरी Passenger Vehicle (PV).

टाटा मोटर्सचा शेअर 1000 रुपयांच्या पलीकडे: (Tata Motors)

मंगळवारी, टाटा मोटर्सच्या शेअरने इतिहास रचला आणि पहिल्यांदाच 1000 रुपयांची पातळी ओलांडली. हा शेअरचा आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे. टाटा मोटर्सच्या दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. यामुळे जरी गुंतवणूकदार खुश असले तरीही ब्रोकरेज घरांनी या वाढीबाबत सावधगिरी व्यक्त केली आहे. नोमुरा या ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, विभाजनाचा कंपनीच्या मूल्यांकनावर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता नाही.

शेअरधारकांसाठी काय फायदा?

टाटा मोटर्सच्या प्रत्येक शेअरधारकाला नवीन Tata Passenger Vehicle आणि Tata Commercial Vehicles या दोन्ही कंपन्यांमध्ये प्रत्येकी 1 शेअर मिळेल. Dimension Consulting चे व्यवस्थापकीय संचालक अजय श्रीवास्तव यांच्या मते, “ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी निश्चितच चांगली बातमी आहे. विभाजनानंतर(Tata Motors), या दोन्ही व्यवसायांची खरी किंमत समोर येईल आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा अधिक चांगल्या प्रकारे अंदाज घेता येईल.”