Tata Motors Shares : योगी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Tata Motors Shares : शेअर बाजाराचा वापर करून अनेक मोठं मोठाल्या कंपन्या सध्या भरपूर नफा कमावत आहेत, आणि यांमध्ये टाटा कंपनीचे शेअर सुद्धा दमदार कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. काल कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक जबरदस्त तेजी आलेली पाहायला मिळाली आणि याचे कारण उत्तर प्रदेश सरकारकडून मिळालेली एक मोठी ऑर्डर आहे असे बाजारातील तज्ञांचे मत आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या एका ऑर्डरमुळे कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढून 724 रुपयांवर पोहोचले आहेत. आता सरकार कडून मिळालेली हि ऑर्डर नेमकी आहे तरी काय? तर मित्रानो, योगी आदित्यनाथ यांच्या अखत्यारीखाली काम करणाऱ्या सरकारने टाटा मोटर्स या कंपनीला राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी डिझेल बसेसच्या 1,350 चेसिस पुरवण्याची ऑर्डर दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टाटा LPO 1618 डिझेल बस चेसिससाठी हि ऑर्डर मिळली आहे. राज्य सरकारच्या अंतर्गतकाम करणाऱ्या या बसेस शहरांर्गत तसेच दूरच्या पल्ल्यांवर प्रवास करतील.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार टाटा मोटर्सला हि ऑर्डर सरकारी निविदा प्रक्रियेद्वारे आयोजित ई-बिडिंगनंतर मिळाले आहे. कंपनीने आत्तापर्यंत देशातील अनेक राज्यांना तसेच सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना 58,000 हून अधिक बसेसचा पुरवठा केला आहे. आणि आता योगी सरकारच्या अंतर्गत त्यांना पुन्हा एकदा नवीन ऑर्डर मिळाली आहे. तसेच कंपनीच्या बाजूने देखील टप्याटप्याने हि ऑर्डर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारला देण्यात आले आहे.

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तुफान वाढ – Tata Motors Shares

हि मोठी ऑर्डर मिळवल्यामुळे कंपनी शेअर बाजारात (Tata Motors Shares) जोमाने कामगिरी करत आहे, आणि त्यांचे वाढते शेअर्स पाहता ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. टाटा मोटर्स या कंपनीची बाजारी परिस्थिती सध्यातरी मजबूत असून त्यांनी हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बसेससाठी CMVR प्रकार मान्यता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, तसेच EV क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली. हि एकूण कामगिरी पाहता आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनी अजून जबरदस्त कामगिरी करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

टाटा मोटर्सच्या शेअर्स बद्दल काय म्हणते ब्रोकरेज कंपनी?

सध्या टाटा कंपनीची परिस्थिती उत्तम असून ब्रोकरेज कंपनीने टाटा मोटर्सचे शेअर्स (Tata Motors Shares) विकत घेण्याचा सल्ला दिलाय. शेरखान या ब्रोकरेज कंपनीने आपल्या संशोधन अहवालात टाटा मोटर्सच्या शेअर्सना 840 रुपयांच्या टार्गेट किमतीसह ‘बाय’ अशी रेटिंगची शिफारस केली आहे. त्यांनी JLR, PV आणि CV व्यवसायात सतत सुधारणा आणि निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्जात घट या पार्शवभूमीवर 840 रुपयांच्या सुधारित PT सह टाटा मोटर्सच्या शेअर्सवर खरेदीची करण्याची त्यांची भूमिका कायम ठेवली आहे.