Tata Pay : टाटा समूह लाँच करणार Tata Pay; Google Pay ला देणार टक्कर

Tata Pay: टेक्नॉलॉजीच्या विश्वात कधी काय बातमी मिळेल सांगत येत नाही. माणसाने आपल्या कौशल्याच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर घडवलेले हे बदल खरोखरच वाखण्याजोगे आहेत. टेक्नोलॉजीमुळे संपूर्ण जग एका मोबाईलमध्ये सामावलंय, आता बहुतांश कामांसाठी पायपीट करण्याची गरज उरलेली नाही किंवा भल्या मोठ्या रांगेत राहून “माझा नंबर कधी येणार” अशी शून्यात नजर ठेऊन वाट बघण्याची गरज नाही. आपला भारत देश तर UPI च्या हमखास वापरासाठी संपूर्ण जगात ओळखला जातोय, हि सर्व तंत्रज्ञानाची किमया आहे. दिवसाला बदलणाऱ्या या जगातून आज एक नवीन बातमी समोर आलीये. एवढे दिवस आपण छोटे मोठे व्यवहार करण्यासाठी गुगल पे चा वापर करायचो, मात्र याच गुगल पे (Google Pay) ला आता मोठी टक्कर मिळणार आहे. कारण डिजिटल युगात आणखीन एक कंपनी ऑनलाईन पेमेंटचा बाजार मांडण्यासाठी सज्ज झाली आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून टाटा समूह आहे.

RBI ने दिली टाटा समूहाला परवानगी – Tata Pay

गुगल पे(Google Pay) ला टक्कर देणारे स्वतः रतन टाटा असणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात व्यवसाय वृद्धिंगत करणारे रतन टाटा आता E-Commerce च्या क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहेत. टाटा समूहाकडून सुरु करण्यात येणाऱ्या या पेमेंट अप्लिकेशनचे नाव टाटा पे (Tata Pay) असे असेल आणि या प्रस्तावाला 1 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून संमती मिळाली आहे. हा एग्रीगेटर परवाना मिळाल्यामुळे टाटा समूह आता कोणत्याही क्षणी E-Commerce चा व्यवसाय सुरु करू शकतो. टाटा पे हि समूहाची डिजिटल शाखा आहे, त्यामुळे आता लवकरच ग्राहकांना गुगल पे प्रमाणेच टाटा पे (Tata Pay) चा वापर करण्याची संधी मिळणार आहे.

रतन टाटा हे भारतातील एक अनुभवी आणि दिग्गज व्यवसायिक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात एका मागून एक क्षेत्र काबीज करत आता डिजिटल दुनियेत पाऊल ठेवलेला टाटा समूह नेमकी कशी प्रगती करून दाखवतो व इतरांसाठी किती मोठा स्पर्धक बनू शकतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. वर्ष 2022 पासूनच ICICI बँक सोबत भागीदारी करत समूहाने UPI पेमेंट्सची सुरुवात केली होती. आतापर्यंत टाटा पे ने ग्राहक वर्ग जोडलेला नाही आणि हे करण्यासाठी त्यांना योग्य रणनीती आखण्याची गरज आहे, सध्या समूह सर्व बाजूनी बाजारात उतरण्यासाठी स्वतःला सक्षम बनत आहे.

याआधी केले आहे डिजिटल विश्वात काम:

डिजिटल विश्वात काम करण्याची हि समूहाची दुसरी वेळ आहे. या अगोदर समूहाकडून भारताच्या ग्रामीण भागांत White Label ATM चालवण्याचा परवाना मिळवून Indicash नावाचा व्यवसाय सुरु करण्यात आला होता. एवढंच नाही तर भूतकाळात टाटा समूह प्रीपेड पेमेंट व्यवसायात देखील काम करत होता, मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हा परवाना परत केला होता. पण आता समूहाला डिजिटल क्षेत्रात E-Commerceचा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळाली असून याच दरम्यान त्यांच्याशिवाय बंगळूरमधल्या DGO ला देखील व्यवसाय सुरु करण्याचा परवाना मिळाला आहे.