बिझनेसनामा ऑनलाईन । टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर महाराष्ट्रात 13000 कोटींची गुंतवणूक (Tata Power Investment) करणार असून यामुळे तब्बल 6 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार आणि टाटा पावर या कंपनीमध्ये नुकतीच एक डील साइन करण्यात आली आहे. राज्यात 2,800 मेगावॅट (MW) क्षमतेचे दोन मोठे पंपेड हायड्रो स्टोरेज प्रकल्प विकसित करण्यासाठी टाटा पॉवरने सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान ऊर्जा सचिव आभा शुक्ला, टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ प्रवीर सिन्हा, टाटा पॉवर जनरेशनचे प्रमुख विजय नामजोशी, हायड्रो पॉवरचे प्रमुख प्रभाकर काळे आणि इतर काही पाहुण्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी समारंभ पार पडला.
कुठे उभारणार प्रकल्प – (Tata Power Investment)
टाटा पॉवर (Tata Power Investment) या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पम्स अँड हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट यासोबत जोडल्या गेलेल्या दोन प्रोजेक्ट वर टाटा पावर कंपनी 13000 करोड रुपये गुंतवणूक करणार आहे. या दोन्ही प्रोजेक्टची कॅपॅसिटी 2800 mw एवढी असणार आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट पुणे येथील शिरवता आणि रायगड या ठिकाणी असलेल्या भिवपुरी या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यात सुरू करण्यात येणाऱ्या प्रोजेक्टची कॅपॅसिटी 1800 मेगावॅट एवढी असेल तर रायगड मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्टची कॅपॅसिटी 1000 मेगा वॅट एवढी असेल.
6000 लोकांना नोकऱ्या मिळणार –
महाराष्ट्र सरकार सोबत टाटाने केलेल्या या डीलमुळे महाराष्ट्राला 2018 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर राज्यातील बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. टाटा पॉवर कंपनीने सांगितलं की हे दोन्ही प्रोजेक्ट सुरू झाल्यावर राज्यातील 6000 लोकांना जॉब मिळेल. टाटा पावर बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रातील वाटर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्टचे संचालन करत आहे. एवढेच नाही तर टाटा पॉवर इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन, इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट, सर्विस बिजनेस यासारख्या क्षेत्रातही काम करत आहे.
या करारानंतर टाटा पॉवरचे MD आणि CEO डॉ प्रवीर सिन्हा यांनी म्हंटल कि, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे हे टाटा पॉवरच्या स्वच्छ आणि हरित उर्जेच्या भविष्यातील प्रवासातील एक मोठे पाऊल आहे. पंप्ड हायड्रो स्टोरेज हा ऊर्जा साठवण्याचा एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम मार्ग आहे आणि हा प्रकल्प नक्कीच एक विश्वसनीय, 24/7 सातत्यपूर्ण वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अक्षय सौर आणि पवन प्रकल्पांना समर्थन देतील असे त्यांनी म्हंटल.