Tata Power Shares : टाटा समूहाला मिळाली आनंदाची बातमी; शेअर्सनी गुंतवणूकदारांना केले खुश

Tata Power Shares : कोणत्याही कंपनीचे यश हे कंपनीच्या वाढत्या शेअर्सवरून ठरवलं जातं. देशातील अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा कंपनीचा समावेश होतो आणि आता टाटा समूहाच्या संबंधित एक अशीच महत्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीला बिकानेर-निमराना हा नवीन प्रकल्प मिळालेला असून हा प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकलचा असेल. प्रकल्प सुरु करण्यासाठी एक नवीन युनिट PFC कन्सलटिंगने स्थापन केले आहे. टाटा समूह हा आपल्या देशातील अनेक जुन्या आणि व्यवसायांपैकी एक आहे. अनेक चढ-उतारांचा सामना केल्यानंतर या कंपनीने नावलौकिक मिळवला आहे टाटा समूहाला मिळालेली नवीन आनंदाची बातमी काय हे सविस्तर उलघडून पाहूयात …

टाटा समूहासाठी आली आनंदाची बातमी: Tata Power Shares

भारतात टाटा पॉवरने अक्षय उर्जा ट्रान्स्मिशन सुविधांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याबद्दल केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लावलेल्या स्पर्धात्मक बोलीमध्ये टाटा समूह यशस्वी झाल्यामुळे त्यांना इरादा पत्र ( Letter Of Intent) देण्यात आलेत आहे. हा प्रकल्प BOOT म्हणजे बांधा, स्वतः चालवा आणि हस्तांतरित करा या संकाल्पनेवर काम करणार आहे. हा प्रकल्प जर का यशस्वी झाला तर राजस्थानमधील बिकानेर संकुलातून एकूण 7700 मेगावॉट अक्षय उर्जेचे निर्माण केले जाईल. तसेच प्रकल्पाअंतर्गत बिकानेर ते निमराना अश्या दोन सबस्टेशन पर्यंत 340 किमी लांबीच्या ट्रान्स्मिशन कोरीडोरची स्थापना केली जाईल.

टाटा समूहाच्या शेअर्सची स्थिती:

टाटा पॉवरच्या शेअर्सची (Tata Power Shares) किंमत सध्या 275.75 रुपये असून कालच्या तुलनेत यात 2.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. व्यापारा दरम्यान कंपनीच्या शेअर्सनी 278.50 रुपयांचा उचांक गाठला आहे, याला 52 आठवड्यातील उच्चांक म्हणावा लागेल. कंपनीचा हा शेअर गेल्या महिन्यात 12.35 टक्क्यांनी तर मागच्या सहा महिन्यात 26 टक्क्यांनी वाढला आहे, कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षात गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांपेक्षा अधिक मोठा परतावा दिला आहे.