Tata Powers :हा काळ सणांचा आहे, दिवाळी फक्त एक महिनाच दूर आहे तर नऊरात्र 2 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवरात्र म्हटलं कि डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे गरबा आणि दांडिया. देवीचा हा उत्सव या नृत्यांशिवाय जवळजवळ अपूर्ण आहे. किती तरी भक्त आणि भाविक वर्ग उत्साहाने या समारंभात भाग घेतात, आणि कैक दिवसांपासून त्यांची यासाठी तयारी सुद्धा सुरु असते. गावागावात आणि चौकात सुरु होणाऱ्या या देवीच्या उत्सवाला आता टाटाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय अनेक नवरात्र मंडळांसाठी खुशखबर आहे. त्यामुळे काय आहे टाटाचा निर्णय आणि कशाला तो या मंडळांना खुश करेल हे जाणून घेऊया.
टाटाने केलंय नवरात्र मंडळांना खुश : Tata Powers
काही दिवसांपूर्वी झालेल्या गणेश उत्सवात टाटा समूहाने विजेचा पुरवठा करत अनेक मंडळांची मदत केली होती. आणि आता नवरात्रातसुद्धा टाटाने पुन्हा एकदा भाविकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नवरात्र मंडळांसाठी निवासी दरात वीज पुरवठा करण्याची घोषणा टाटा समूहाने केली आहे. अनेक सणांप्रमाणे नवरात्र हा सुद्धा भाविकांसाठी महत्वाचा आणि उत्साह जागवणारा सण आहे, या दरम्यान मंडळांकडून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, जे यशस्वी होण्यासाठी गरज असते ती अखंडित मिळणाऱ्या विजेची. मात्र विजेच्या भावात काहींसे बदल झाल्यामुळे हि योजना जरा महागात पडणारी ठरू शकली असती पण टाटा समूहाचा (Tata Powers) हा निर्णय मंडळांना दिलासा देणारा आहे.
टाटा समूहाने काय केली घोषणा :
टाटा समूहाने येणाऱ्या नवरात्र उत्सवात विजेचे अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी काही नवरात्र उत्सवाच्या मंडळांना संपर्क केला होता. गेल्या वर्षीचा आकडा पडताळून पाहत त्यांनी यावर्षी मंडळांना अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते. या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान टाटा पावर्स (Tata Powers) कमीत कमीत कागदपत्रांची मागणी करत उत्सवाच्या मंडळांना निवासी शुल्कात विजेचे कनेक्शन देणार आहेत. टाटा समूह तुम्हाला केवळ वीज पुरवठा करणार नाही तर सुरक्षा ऑडिट आणि देखरेख करून मदत देखील करणार आहे, सध्या सोशल मिडियाचा वापर करून जनजागृती करण्याची हि टाटा पावर्सची योजना आहे.
या वीज कनेक्शनसाठी कसा अर्ज करावा?
टाटा पावर्सचे वीज कनेक्शन मिळवण्यासाठी मंडळांनी टाटा पावर्सच्या अधिकृत साईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. किंवा तुम्ही कस्टमर रिलेशन सेंटरमध्ये जाऊन बृहन्न मुंबई महानगरपालिकेचं हरकत प्रमाणपत्र आणि चाचणी अहवाल, मालकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा यांसारखे दस्तऐवज घेऊन त्यांच्याशी संपर्क साधू शकता. याव्यात्रिक्त सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही टाटा पावर्सला Whatsapp वरून संदेश पाठवू शकता किंवा मिसड कॉल देऊ शकता.