बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये आज गुरुवारी म्हणजेच आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. आज मार्केट बंद होताना सेंसेक्स 194 अंकानी घसरला तर निफ्टी मध्येही 46.65 अंकांनी घट झाली. एकीकडे ही घसरण सुरु असताना आज टाटा कंपनीच्या टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड म्हणजेच TTML चा शेअर चांगलाच तेजीत आला आहे. आज व्यवहाराच्या शेवटी TTML शेअरची किंमत 3.67% ने वाढून आणि 63.76 रुपये झाली.
TTML च्या शेअरने मोठ्या मुदतीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर असा जबरदस्त रिटर्न मिळवून दिला आहे. मागील ३ वर्षांचे सांगायचं झाल्यास, या काळात TTML च्या शेअरने तब्बल 2200 टक्के रिटर्न दिला होता. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना २ वर्षांच्या कालावधीत 290 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाला आहे. मार्च 2023 मध्ये या स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 49.80 रुपये होता. तर त्याच्यापूर्वी म्हणजेच 2 सप्टेंबर 2022 रोजी, TTML च्या शेअरची किंमत 149 रुपयांच्या स्तरावर होती.
मार्च तिमाही निकाल
दरम्यान, मार्च तिमाहीत TTML ला 277 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ तोट्यात किंचित घट पाहायला मिळाली. TTML चा रेवेन्यू मार्च तिमाहीत 280.13 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत रेवेन्यू मध्येही कंपनीला नुकसान पाहायला मिळालं. आता मात्र TTML च्या शेअर मध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे.