Tata Sons IPO: लवकरच येणार Tata Sons चा IPO; केवळ बातमीनेच गुंतवणूकदार झालेत खुश

Tata Sons IPO: आपल्या देशातील सर्वात अनुभवी व्यवसायिक घराण्यांपैकी एक म्हणजे टाटा. टाटा समूहाला भारतीय बाजारपेठेतील कणन्कण माहिती आहे आणि आजही ते तेवढ्याच जोमाने आजही ते वावरतायत. सध्या कंपनी नवीन IPO बाजारात आणण्याच्या मार्गावर असून यामुळे गेल्या आठवड्यात कंपनीचे शेअर्स तेजीत होते आणि Market Cap 85,000 कोटी रुपयांनी वाढले आहे. गेल्या आठवड्यात Tata Chemicals च्या शेअर्समध्ये सर्वातधिक वाढ झालेली पाहायला मिळाली होती.

टाटा कंपनी आणणार नवीन IPO: (Tata Sons IPO)

अनेक वर्षानंतर आता टाटा समूह नवीन IPO आणण्याच्या मार्गावर आहे आणि केवळ या बातमीनेच गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे. गेल्यावेळी टाटा टेक्नॉलॉजीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला असून गुंतवणूकदारांचे खिसे बऱ्यापैकी भरले आहेत. त्या महत्वाच्या घटनेनंतर आता पुन्हा टाटा समूहाची आणखीन एक कंपनी IPO बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार Tata Sons लवकरच IPO (Initial Public Offering) आणण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वरच्या स्तरावरील NBFC ला बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी दिला असून Tata Sons ला सप्टेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. माध्यांना मिळालेल्या माहितीनुसार Tata Sons च्या IPO मधून Tata Chemicals ला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झालाय आणि अनेकांनी ऑनलाईन स्टॉक खरेदीसाठी गर्दी केली आहे.