Tata Sons: आज बाजारात फिरत असलेली सर्वात महत्वाची बातमी Tata Sons बद्दल आहे, आणि त्याचे प्रमुख कारण आहे कंपनीने करू घातलेला करार. माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार Tata Sons ही कंपनी Tata Consultancy Services Limited (TCS) चे 2.34 कोटी शेअर्स Block Deal च्या माध्यमातून विकण्याचा विचार करत आहे. या विक्रीची किंमत 4,001 रुपये प्रति शेअर असेल आणि त्यामुळे कंपनी सुमारे 1.1 अब्ज डॉलर इतकी रक्कम उभारण्याचा विचार करत आहे.
TCS ची नवीन बातमी काय? (Tata Sons)
बातमी समजून घेण्याआधी हे जाणून घ्या की TCS म्हणजे Tata Consultancy Services ही देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते, आणि मुकेश अंबानी यांच्यानंतर टाटा यांचंच नाव घेतलं जातं आणि म्हणूनच ही माहिती भारतीय बाजारपेठेबद्दल जाणून घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे.
टाटा समूहाच्या मालकीच्या Tata Sons आणि Tata Investment Cooperation यांच्याकडे 31 डिसेंबर 2023 पर्यंत TCS चा एकूण 72.41 टक्के वाटा होता. यापैकी Tata Sons ची मालकी 72.38 टक्के आहे. आता TCS चे बाजारी भांडवल 15 लाख कोटी रुपये असल्याने 2.32 कोटी शेअर्स ही केवळ 0.65 टक्के मालकी दर्शवते.
Block Deal म्हणजे काय?
कधी कधी मोठमोठी सौदेबाजी थेट बाजारात न होता, दोन मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये गुप्तपणे होते. या सौद्यांना ‘Block Deal’ म्हणतात(Tata Sons). यामध्ये हजारो किंवा लाखोच्या संख्येने शेअर्स एकाच वेळी खरेदी-विक्री केले जातात.